ऑनलाइन लोकमत
धर्माबाद, दि. 6 - धर्माबाद शहरापासून पाच कि.मी.अंतरावर असलेल्या वाडी हनूमान मंदीर जवळ पहाटे चारच्या दरम्यान बिलोली कडून धर्माबादकडे मेंढ्या घेऊन जाणारा टेम्पो उलटुन झालेल्या अपघातात 20 मेंढ्या ठार तर 2 व्यक्ती जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
गुरुवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास भोकर येथून बिलोली व धर्माबाद मार्गे तेलगंणातील बांसवाडा येथे मेंढ्या घेऊन जाणारा टेम्पो क्रमांक एम.एच.26 बी 7618 हा धर्माबाद रोडवर असलेल्या कुंडलवाडी जवळील वाडी मारोती जवळ आला असता रस्त्याचे काम चालु असल्याने एकेरी वाहतुक चालु आहे. याचा अंदाज न आल्याने रस्त्याच्या बाजुस असलेल्या खड्यात उलटला. या अपघातात 20 मेंढ्या मृत्युमुखी पडल्या असुन टेम्पोत प्रवास करणारे सायलु भुमैय्या म्यागलवार ( रा.कोनापुर) , सुरेखा मल्लेश म्यागलवार ( रा.कोनापुर) तसेच असे दोघे जखमी झाले आहेत.
जखमींना धर्माबाद येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. राज्य महामार्ग क्र.268 कुंडलवाडी ते धर्माबाद रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून अतिशय संथगतीने चालु आहे.जी.जी.कन्स्ट्रक्शन, नांदेड या कंपनीला या कामाचे कंत्राट देण्यात आले आहे.या रस्त्यावर गेल्या वर्षभरापासुन गुत्तेदाराने रस्त्याच्या एका बाजुने गिट्टी अंथरून ठेवल्यामुळे एकेरीच वाहतुक सुरू आहे.
त्यामुळे दररोज छोटे- मोठे अपघात घडत आहे.गेल्या दोन महिन्यापुर्वी याच मार्गावर बाभळी गावा जवळ कार व दुचाकीच्या अपघातात एका 12 वर्षीय निष्पाप चिमुकलीला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर बाभळीवासीयांनी तब्बल सहा तास रास्ता रोको केला होता.त्यावेळी प्रशासनातर्फे गुत्तेदारावर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.