नांदेड, राष्ट्रमाता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व महिला शिक्षण दिन बहुजन भारत पार्टीच्या वतीने साजरा करण्यात आला. दरम्यान, महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बी.एस. गजले, जिल्हाध्यक्ष साहेबराव गुंडिले, जिल्हा सचिव चंद्रकांत ठाणेकर, आश्विन कोरे, अरुण गऊळकर, ज्ञानेश्वर मिरासे, नारायण कदम, तुकाराम रणदिवे, रंगनाथ गजले आदींची उपस्थिती होती.
परिवार प्रतिष्ठान सर्वेक्षण करणार
नांदेड, परिवार संस्था नांदेड व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे तंबाखू नियंत्रण व्यसनमुक्ती अभियान नुकतेच संपन्न झाले. अध्यक्षस्थानी डॉ. पी.डी. जोशी पाटोदेकर, तर मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक अभिजित संगवी, आलेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, प्रतिष्ठानच्या माध्यमातून व्यसनाधीनतेचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे जोशी यांनी सांगितले. प्रास्ताविक बालाजी आलेवार यांनी, तर सूत्रसंचालन अर्चना पाराळकर यांनी केले. किरण कदम यांनी आभार मानले. यावेळी जे.एम. पठाण, भदरगे, तारू आदींची उपस्थिती होती.