शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

आरोपीने पोलिसांवर रोखली बंदूक; निरीक्षकाने प्रसंगावधान राखत चालविली गोळी, केले जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2022 11:36 AM

चौकशी दरम्यान आरोपीने पोलिसांची बंदूक घेऊन त्यांच्यावरच रोखली

नांदेड: नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार करून तरुणावर तलवारीने हल्ला केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील कैलास बिगणिया टोळीतील अट्टल दिलीप डाखोरे याला पकडण्यासाठी गेलेल्या पथकावरच आरोपीने बंदूक रोखली. प्रसंगावधान राखत पोलीस निरीक्षक द्वारकदास चिखलीकर यांनी डाखोरे च्या मांडीवर गोळी मारून त्याला जेरबंद केले.

30 एप्रिल रोजी तुप्पा भागात किरकोळ कारणावरून आरोपी दिलीप डाखोरे याने सतीश कसबे याच्यासोबत वाद घालून गोळी झाडली होती. सुदैवाने डाखोरेचा नेम चुकला. त्यानंतर डाखोरेने कसबेवर तलवारीने हल्ला केला होता. घटनेनंतर तो फरार झाला होता. 4 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनी द्वारकादास चिखलीकर यांना डाखोरे हा लोहा ते पालम रस्त्यावर सुनेगाव येथे असल्याची माहिती मिळाली. 

पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनवणे हे त्याची चौकशी करीत असताना डाखोरे याने सोनवणे यांच्या कमरेला लावलेली पिस्टल हिसकावून पोलिसांवर रोखली. पोनी चिखलीकर यांनी डाखोरेला  शरण येण्यास सांगितले. परंतु डाखोरे हा पोलिसांवर बंदूक रोखत जीवे मारण्याची धमकी देत होता. पळून जाण्याच्या तयारीत असतानाच चिखलीकर यांनी प्रसंगावधान राखत डाखोरेच्या मांडीवर गोळी चालविली. त्यामुळे डाखोरे कोसळला. पोलिसांनी लगेच त्याच्यावर झडप  घालून त्याला पकडले. त्याच्या जवळील बंदूक ही जप्त केली. चिखलीकर यांच्या तत्परतेने इतर सहकारी कर्मचाऱ्यांचा जीव भांड्यात पडला. दरम्यान बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर पोलीस ऍक्शन मोडवर आले आहेत, गेल्या काही दिवसात 26 बंदुकी आणि शेकडो तलवारी जप्त केल्या आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड