शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

चिमुकल्यांनी ५ तास उपाशीपोटी बसून मिळवले शिक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2023 5:55 AM

'आम्हाला शिक्षक हवेत' मागणीसाठी नांदेड जि. प. दालनासमोर मुलांनी भरवली शा‌ळा

सचिन मोहिते, लोकमत न्यूज नेटवर्क, नांदेड: विद्यार्थिसंख्येनुसार शिक्षकांची पदे भरावीत यासह गणित, इंग्रजी विषयांना शिक्षक द्यावेत, या मागणीसाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी मरखेल येथील जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी नांदेडमध्ये जिल्हा परिषदेच्या सीईओंच्या दालनासमोर ठिय्या मारला. विद्यार्थी चार तास उपाशीपोटी बसले आणि शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतरच त्यांनी आंदोलन मागे घेतले. शिक्षकांच्या मागणीचा प्रश्न मागील वर्षीपासून रखडला होता. प्रशासनाला सात वेळा पत्र पाठवून शिक्षकांची मागणी करण्यात आली. मात्र उपयोग झाला नाही. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी ४० विद्यार्थ्यांनी थेट नांदेड गाठले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या दालनासमोर ठिय्या मांडला.

आम्हाला शिक्षक हवेत, या मागणीसाठी गुरुवारी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर मुलांनी शा‌ळा भरवली होती.

अन् नियुक्ती आदेश घेऊनच परतले ‘आंदोलक’ 

मरखेल जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकांची पदे मंजूर करावीत, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. शिक्षकांचे नियुक्ती आदेश मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि ग्रामस्थांनी केला होता. अखेर गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शाळेसाठी इंग्रजी, गणित आणि दोन पदवीधर शिक्षकांच्या नियुक्तीचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले. नियुक्ती आदेश मिळाल्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी