हदगाव : अनैतिक संबंधातून सहशिक्षिका ब्लॅकमेल करत असल्याने गारगव्हण येथील एका शिक्षकाने जिल्हा परिषद शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केली. अनिल मोहन चव्हाण ( ४०) असे मृताचे नाव आहे. आज सकाळी ८:०० वाजता शाळा उघडल्यानंतर सेवकास चव्हाण यांनी शाळेत आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
अनिल चव्हाण हे मुखेड तालुक्यातील सोनपेठवाडी या गावचे मूळ रहिवासी होते. वस्तीशाळेवर काही वर्ष काम केल्यानंतर हदगाव तालुक्यातील गारगव्हाण येथे सन २०१४ रोजी जिल्हा परिषद शाळेवर त्यांची नियुक्ती झाली. तेव्हापासुन ते याच शाळेवर कार्यरत होते. हदगाव येथे ते भाड्याच्या खोलीत राहत. दरम्यान, याच शाळेतील सहशिक्षिकेसोबत त्यांचे अनैतीक संबंध जुळले. मात्र, सहशिक्षिका चव्हाण यांना ब्लॅकमेल करू लागली. सहशिक्षिकेकडून वारंवार पैशांची मागणी आणि घरापर्यंत प्रकरण समजल्याने चव्हाण तणावात होते. यातूनच बुधवारी निकालाचे काम असल्याचे सांगून चव्हाण शाळेत आले आणि रात्री येथेच थांबले. आज सकाळी ८ वाजता सेवकाने शाळा उघडली असता चव्हाण यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. मनाठा पोलीस स्टेशनचे सपोनी एस. एस. शेकडे, कृष्णा यादव पंचनामा करून ऊत्तरीय तपासणीसाठी मृतदेह हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
काय आहे सुसाईड नोटमध्ये ?सहशिक्षिका वारंवार पैशाची मागणी करीत असल्याने मी थकुन आत्महत्या करीत असल्याचे चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.