शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 6:07 AM

ladki bahin yojana Fraud: सचिन सीएससी सेंटर चालकाने रोजगार हमी योजनेतील विहिरींचे पैसे आले आहेत असे सांगून ओळखीच्या पुरुषांकडून आधार कार्ड, बँक पासबुक अशी कागदपत्रे जमा केली.

- सुनील चाैरेलोकमत न्यूज नेटवर्कहदगाव (जि. नांदेड) : आधार कार्डवर खाडाखोड करून लाडक्या बहिणींचे पैसे पतीच्या खात्यात जमा केले. त्यानंतर सदर रक्कम सीएससी केंद्र चालकाने परस्पर हडप केल्याचा धक्कादायक प्रकार मनाठा, (ता. हदगाव) येथे उघडकीस आला आहे. लाखोंचा घोटाळा करून लाडक्या बहिणींसह त्यांच्या पतीची फसवणूक करणारा सीएससी सेंटर चालक गावातून पसार झाला आहे.   

सचिन सीएससी सेंटर चालकाने रोजगार हमी योजनेतील विहिरींचे पैसे आले आहेत असे सांगून ओळखीच्या पुरुषांकडून आधार कार्ड, बँक पासबुक अशी कागदपत्रे जमा केली. बहिणींचे अर्ज भरताना महिलांचा आधार क्रमांक टाकण्याऐवजी पुरुषांचा आधार क्रमांक टाकला. त्यांचा खाते क्रमांकही दिला. जेव्हा पैसे जमा झाले, त्यानंतर रोजगार हमी योजनेचे पैसे आल्याचे सांगून संबंधित पुरुषांचे अंगठे घेऊन जमा झालेली रक्कम उचलून घेतली.  

चौकशीचे आदेशनेमका काय प्रकार घडला आहे, याची चौकशी करण्याचे आदेश संबंधित तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना दिले आहेत. अशा प्रकारे कोणत्याही योजनेची रक्कम परस्पर उचलणे हा गुन्हाच आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुषांची नावे कशी घेतली गेली? यामध्ये कोण कोण सहभागी आहे, हे चौकशीनंतर पुढे येईल. दोषींसह संबंधित केंद्र चालकावर कायदेशीररीत्या गुन्हादेखील दाखल करण्यात येईल.     - अभिजीत राऊत,     जिल्हाधिकारी, नांदेड

असे फुटले बिंग...मनाठा येथील अलीम सलीम कादरी यांच्या मोबाइलवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्कम जमा झाल्याचा संदेश आल्याने या घोटाळ्याचे बिंग फुटले. त्यामुळे गावात चर्चा सुरू झाली. मनाठा गावातील ३८ तर बामणी फाटा येथील ३३ भावांचा आधार क्रमांक वापरून ३ लाख १९ हजार ५०० रुपये परस्पर उचलून केंद्रचालक पसार झाला आहे. 

शासनाला तर चुना लावला, पण बहिणीच्या तोंडाला पाने पुसली आहेत. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या अलीम कादरी यांच्या मोबाइलवर संदेश आला, त्याने लगेच सेंटर चालकाला विचारपूस केली. तेव्हा कोणाला सांगू नको, काही होत नाही, असे सेंटर चालकाने सांगितले. तुमची कागदपत्रे परत करतो, असे म्हणून तो सकाळपासून सेंटरला कुलूप लावून पसार झाला. 

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाfraudधोकेबाजी