नांदेड : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ५८ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा समारोप यशवंत सेवा. संस्था व प्रतिष्ठान, अंबाजोगाई च्या वतीने गो. पु. देशपांडे लिखित, शैलेश कुलकर्णी दिग्दर्शित चाणक्य विष्णुगुप्त या ऐतिहासिक नाटकाने झाले.समाजकारण, राजकारण, अर्थकारण, मानवी स्वभाव व त्याचे विविध पैलू ओळखणारा हा पुरुष यवनग्रीक राजा सिकंदर यांच्याकडून भारतीय सम्राट पौरवाचा पराभव झाला. हे शल्य चाणक्य विष्णुगुप्त ह्या तक्षशिला विद्यापिठात अध्यापक असणाऱ्या या शिक्षकास बोचू लागले. मगधचा सम्राट नंद याची या लढायीत पौरवाला कसलीही मदत झाली नाही. तेंव्हा एकसंघ राज्याची गरज विष्णुगुप्ताला भासू लागली. नंद राजाचे साम्राज्य उलथून टाकण्याचा प्रण त्यांनी केला व ते साम्राज्य उलथूनही टाकले. ऐतिहासिक विषय असलेले हे नाटक दिग्दर्शकाने अभ्यासपूर्ण हाताळले.यात आनंद जोशी, मिलिंद कºहाडे, अशोक सिरसाट, गीतांजली कुलकर्णी, अशोक बिडकर, योगेश कुलकर्णी, संदीपान फड, सागर जोशी, महादेव लोखंडे, गणेश कदम, बलजीत गुळभिले, गोविंद पांचाळ, भगवान दराडे, सिद्धेश्वर पांचाळ, वेदांत सुरवसे, वैभव चिलवंत, सार्थक धायगुडे, केदार घोडके, प्रद्युम्न गित्ते, यांनी भूमिका बजावली. नृत्यांगना म्हणून श्रावणी खंदारे, अर्पिता लखेरा, प्रियंका साठे, श्वेता माले, कीर्ती गुव्हाडे, निकिता राजमाने, स्नेहा राजमाने, रितू राजमाने, प्राची गूळभिले, समिधा जोगी यांनी भूमिका केली.तर प्रकाशयोजना- बळवंत देशपांडे, नेपथ्य झ्र गणेश कदम, संगीत- अद्वैत देशपांडे, अर्णव जोशी, रंगभूषा- आरती काळे, प्रज्ञा रामदासी, भाग्यश्री गीते, वेशभूषा- सत्यशीला चावरे, इंदू मुंडे, शिवकन्या पांचाळ, रंगमंच व्यवस्था- शीतल जोशी, मंजुषा फड यांनी सांभाळली तर निर्मिती संकल्पना होती प्रा. केशव देशपांडे यांची.यावेळी प्रा. पंडित सोनाळे, जेष्ठ रंगकर्मी बसेवश्वर घोडके, डॉ. विजयकुमार माहुरे, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, सदस्य राम चव्हाण यांनी सर्व रंगकर्मी, रसिकप्रेक्षकांच्या वतीने प्रा. जेष्ट रंगकर्मी केशव देशपांडे यांच्या हास्ते समन्वयक दिनेश कवडे यांचा सत्कार केला. स्पर्धेचा निकाल ५ किंवा ६ डिसेंबर रोजी घोषित होणार आहे़
ऐतिहासिक नाट्याने स्पर्धेचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 12:46 AM
५८ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा समारोप यशवंत सेवा. संस्था व प्रतिष्ठान, अंबाजोगाई च्या वतीने गो. पु. देशपांडे लिखित, शैलेश कुलकर्णी दिग्दर्शित चाणक्य विष्णुगुप्त या ऐतिहासिक नाटकाने झाले.
ठळक मुद्देराज्य हौशी नाट्य स्पर्धाचाणक्य विष्णुगुप्तमुळे बदलला इतिहास