शालेय साहित्य वाटप
माहूर : अंजनखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या १२५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी वाडगुरे, श्रीमती वाघमारे, आकाश नाईके, संदीप आडावे, विलास भगत, दिगंबर वाघाडे आदी उपस्थित होते.
महिला शिक्षक दिन
कंधार : येथील कलापुष्प प्रतिष्ठानच्या वतीने महिला शिक्षण दिनानिमित्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थिनींना चित्रकलेचे साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रतिष्ठानच्या सचिव द्रौपदा गायकवाड, सोपान कांबळे, किरण गुंडाळे, सुलोचना कांबळे, स्वाती कांबळे, प्रतीक्षा ढवळे आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापिकांची सभा
बिलोली : तालुक्यातील लोहगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये मुख्याध्यापकांची सहविचार सभा घेण्यात आली. यावेळी गटशिक्षणाधिकारी दिगंबर तोटरे यांनी मार्गदर्शन केले. सभेला शिक्षण विस्तार अधिकारी सागरबाई भैरवाड, केंद्रप्रमुख यादवराव कौटकर, बालाजी येसगे, माधव लोलमवाड, सुरेश राठोड, गुणवंत हलगरे, प्रल्हाद ढाकणे, श्रीनिवास मंगनाळे, शेख महमूद, संतोष पाटील उपस्थित होते.
इरलोड रुजू
कुंडलवाडी : येथील पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून देगलूरचे गंगाधर इरलोड यांच्याकडे प्रभारी पदभार देण्यात आला. यापूर्वीचे जी.एस. पेंटे यांची लोहा येथे बदली झाली. त्यांच्या जागेवर ज्ञानेश्वर ठोंबरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र ठोंबरे रुजू न झाल्यामुळे इरलोड यांच्याकडे प्रभारी पदभार देण्यात आला.
फोले यांचा सत्कार
हदगाव : हदगाव पंचायत समितीच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी पदी के.व्ही. फोले यांची नियुक्ती झाल्याबद्दल विविध आदिवासी संघटनांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.डी.के. नाईक, रामदास डवरे, डी.के. बुरकुले, दादाराव ढोले, प्रा. हरिदास बोडके, शिवाजी सोनटक्के, रामदास मिरासे, पी.आर. भिसे, एल.बी. भिसे, बंडू पाटे, पांडुरंग गायकवाड, मारोती वानोळे आदी उपस्थित होते.
आग लागून ऊस खाक
बाऱ्हाळी : शेतातून गेलेल्या विजेच्या तारांचा एकएकाला घर्षण होऊन शॉर्टसर्किटमुळे ऊस जळाल्याची घटना निवळी येथे घडली. यात ललिताबाई निवळीकर यांच्या शेतातील तीन एकरवरील ऊस जळाला. संबंधित शेतकऱ्याने महावितरणकडे नुकसानभरपाईसाठी अर्ज केला आहे.
तिघे जखमी
उमरी : उमरी ते जामगावदरम्यान दोन वेगवेगळ्या अपघातात तिघे जखमी झाले. तिघांनाही ग्रामीण रुग्णालयात उपचार करून नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. मारोती चंदापुरे यांनी दिली. या अपघातात शंकर शिंदे यांच्या दोन्ही पायांना मोठी दुखापत झाली आहे.
जोगी विद्यालयात जयंती
किनवट : दहेली येथील श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षक म्हणून साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी.आर. वाडेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून डावळे, डोळस, जोगी, पहूरकर, सूर्यवंशी, राठोड, सय्यद, चौधरी आदी उपस्थित होते.
हसनाळ ग्रा.पं. बिनविरोध
मुखेड : मुखेड तालुक्यातील हसनाळ (प.दे.) ग्रामपंचायत बिनविरोध निघाली आहे. आ.डॉ. तुषार राठोड यांनी नूतन सदस्यांचे स्वागत केले. यावेळी माजी सरपंच एकनाथराव नाईक, दत्ता नाईक, शेषराव कांबळे, महाजन नाईक, बालाजी नाईक, सखाराम पाटील, उत्तम नाईक, राजीव सूरनर आदी उपस्थित होते.