नांदेड : जिल्ह्याचे काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर नांदेड जिल्हा काँग्रेसमधील अनेक बडे नेते भाजपात गेल्याने जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला घरघर लागली आहे. असे असताना एका कंत्राटदाराने थकीत २० लाख रुपये न दिल्यास चक्क शहर व जिल्हा काँग्रेस कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षावर पहिल्यादांच जिल्ह्यात अशाप्रकारे नामुष्की ओढवली आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वीच नांदेड शहरातील नवा मोंढा येथे असलेल्या शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाचे बांधकाम व नूतनीकरण करण्यात आलेले आहे. पण, बांधकाम पूर्ण झाल्यानंतर वारंवार चकरा मारूनही सदर कंत्राटदाराला कामाचे पैसे अद्याप मिळाले नाहीत. त्यामुळे संतापलेल्या कंत्राटदाराने दोन दिवसात जिल्हा काँग्रेस कार्यालयाकडून २० लाख रुपये मिळाले नाही तर कार्यालयापुढे उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. तसेच यानंतरही २० लाख रुपये त्वरित न दिल्यास जिल्हा कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. पैसे त्वरित द्यावे, अन्यथा आत्मदहन करणार असल्याचेही म्हटले आहे.
तर राहुल गांधी यांनी पैसे मागणारकाँग्रेसच्या नवीन जिल्हाध्यक्षांनी माझे बांधकाम व नूतनीकरणाचे प्रलंबित असलेले २० लाख रुपये त्वरित द्यावेत, अन्यथा मी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेत जाऊन न्याय मागणार आहे.- कंत्राटदार