जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक २,१६२ शाळा आहेत. त्यानंतर खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांसह शासकीय तसेच इतर संस्थांच्या आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेत भारत नेटवर्क या उपक्रमाच्या माध्यमातून इंटरनेट सेवासुविधा पुरविण्यात आली आहे. परंतु, बहुतांश शाळांत आजपर्यंत ही सेवा कार्यान्वितच झालेली नाही. त्यामुळे सदर सेवा असून अडचण नसून खोळंबा असे चित्र आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये भारत नेटवर्क योजनेतून ग्रामपंचायतींच्या माध्यमातून इंटरनेट सेवा पुरविण्यात आली आहे. त्यामुळे जवळपास ९० टक्के शाळांमध्ये नेटची अडचण नाही. काही ठिकाणी शिक्षकांच्या मोबाइलचा आधार घेतला जातो.
- प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी
आमच्या गुरुजींकडून मोबाइलवर व्हिडिओ टाकले जातात. परंतु, घरात कोणाकडेच मोठा मोबाइल नाही. त्यामुळे आम्ही वही-पुस्तक घेऊनच अभ्यास करतो. शाळेत शिक्षक आले की ते वह्या तपासून देतात आणि पुन्हा अभ्यास देतात. त्यामुळे मोबाइलवरचे व्हिडिओ नाही पाहत.
- सोपान ठोंबरे, विद्यार्थी
अभ्यासासाठी मोठा मोबाइल घेतला आहे. परंतु, इंटरनेटची रेंज नसल्याने व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी गावाबाहेर जावे लागते. त्यात काही वेळा तर तिथेही रेंज येत नाही. मग घराच्या छतावर जाऊन व्हिडिओ डाऊनलोड करून आम्ही अभ्यास करतो.
- गजानन बाेईनवाड, विद्यार्थी
शाळेत इंटरनेटची सुविधा आहे. परंतु, त्यापेक्षा मोबाइलवरील इंटरनेट स्पीडने चालते; म्हणून बहुतांशवेळा मोबाइ०लचाच आधार घेण्यात येतो.
- अदित्य देवडे, शिक्षक