तालुक्यात सर्वाधिक ३३ हजार ७४४ हेक्टर म्हणजेच ७० टक्के क्षेत्र हे सोयाबीनचे आहे. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्वामध्ये झालेल्या पावसामुळे सोयाबीनचेही नुकसान झाल्याने उतारा कमी येण्याची शक्यता आहे. सोयाबीनची काढणी सुरू असतानाच चार दिवसांपासून अधूनमधून सुरू असलेल्या पावसामुळे शेतात पाणी जमा होत असून, शेतकऱ्यांनी काढणीचे काम थांबविले आहे. सोयाबीन भरत असतानाच पावसामुळे त्याचे नुकसान होणार आहे. काढणीची प्रक्रिया पूर्ण होऊन सोयाबीन घरी येईपर्यंत निसर्गाची साथ मिळणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
कोरोनाचा ग्राफ उतरला
तालुक्यात १ सप्टेंबरपासून आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मृत्यूही निरंक आहे. नायगाव शहर वगळता तालुक्यात २२ ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू आहे. ग्रामीण रुग्णालय, नायगाव व प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या ठिकाणीही रविवारी केंद्र सुरू आहे. कोरोना लस कमी पडणार नाही, याकडे वैद्यकीय अधीक्षक व आरोग्य अधिकारी विशेष लक्ष देत आहेत.