- विशाल सोनटक्के
कोरडवाहू शेतीमुळे एकच पीक घेण्याकडे मराठवाड्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा कल दिसतो. मात्र, ही पद्धतच शेतकऱ्याच्या जिवावर बेतत असल्याचे जाणवते. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्राध्यापक आर. डी. अहिरे आणि पी. एस. कापसे यांनी मराठवाड्यातील या ३२० आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील सदस्यांशी संवाद साधला. या संवादानंतर आणि अभ्यासातून त्यांनी शेतकरी आत्महत्या मागील काही निष्कर्ष मांडले आहेत.
सिंचऩ, शेतीपूरक व्यवसायांच्या अभावामुळेच मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या
मराठवाड्यात झालेल्या शेतकरी आत्महत्यांपैकी तब्बल ८२.१८ टक्के शेतकरी आत्महत्येच्या घटना पाहिल्या असता, सदर शेतकरी हा एकच पीक (सोल क्रॉपींग) घेत असल्याचे दिसून आले आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी १७.८२ टक्के शेतकऱ्यांच्या शेतात अंतर्गत पीक घेतले जात होते. विशेष म्हणजे, उत्पादकतेचा विषयही येथे महत्त्वाचा आहे. या शेतकऱ्यांच्या शेतातील पिके आणि त्यांची सरासरी उत्पादकता पाहिल्यास पीक उत्पादकता वाढविण्यासाठी आणखी प्रयत्न होण्याची गरज दिसून येते.
खाजगी सावकारीमुळे शेतकरी अडकतो कर्जाच्या विळख्यात
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांतील ६१.७८ टक्के शेतकऱ्यांनी खरिपामध्ये सोयाबीन पीक घेतले होते. याची सरासरी उत्पादकता हेक्टरी ९.५६ क्विंटल एवढी होती. ५७.१८ टक्के शेतकऱ्यांनी कापूस पीक घेतले होते. याची उत्पादकता प्रतिहेक्टरी ११.२० एवढी होती तर ३३.४३ टक्के शेतकऱ्यांनी वाटाणा लावला होता. याची उत्पादकता प्रतिहेक्टरी ७.३४ क्विंटल एवढी होती. रबीचा विचार करता २८.१२ शेतकऱ्यांकडे हरभरा होता, याची उत्पादकता प्रतिहेक्टरी ७.२० एवढी, ३०.९३ टक्के शेतकऱ्यांनी ज्वारी घेतली होती. याची उत्पादकता हेक्टरी ९.६५ तर गहू घेतलेल्या १६.२५ टक्के शेतकऱ्यांच्या गव्हाची सरासरी उत्पादकता हेक्टरी ११.९९ टक्के एवढी असल्याचे दिसून आले.
मराठवाडयात दुष्काळ, सिंचन सुविधांअभावी सर्वाधिक शेतकरी आत्महत्या
घटती जमीनधारणा चिंता वाढविणारीघटत्या जमीनधारणेचा प्रश्नही जटील आहे़ मराठवाड्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी ३१़५७ टक्के शेतकऱ्यांकडे केवळ १ हेक्टरपर्यंत जमीन होती़ तर ३९़६८ टक्के शेतकऱ्यांकडे १ ते २ हेक्टर एवढीच जमीन होती़ २ ते ४ हेक्टर जमीन असतानाही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या २१़२५ टक्के आहे़ ४ ते १० हेक्टर जमीन असतानाही ६़५६ टक्के शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून १० हेक्टरहून अधिक जमीन असताना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ०़९४ टक्के इतकी असल्याचे हा अहवाल सांगतो़