लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसाचा फटका नांदेडकरांना सोसावा लागत आहे. जलस्त्रोतातील पाणी आटू लागल्याने टँकरची मागणी वाढत असून सद्य:स्थितीत जिल्ह्यातील २६ वाड्या आणि २७ गावांमध्ये ८४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांत ३६० विहिरी, बोअरचे अधिग्रहणही केले आहे.यंदाच्या पावसाळ्यात सरासरीच्या अवघा ६७ टक्के पाऊस झाला. त्यातही किनवट, माहूरसारख्या तालुक्यात पावसाची सरासरी अत्यल्प राहिली आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण कमी आहे. दुसरीकडे तपमानाचा पारा ४० हून अधिक असल्याने पाण्याचे बाष्पीभवनही वेगाने होत असल्याने जिल्हाभरात टंचाईची तीव्रता वाढत असल्याचे चित्र आहे. टंचाईबरोबरच प्रशासनाकडे टँकरची मागणी वाढत आहे.तसेच अधिग्रणासाठीचे प्रस्तावही दाखल होत आहेत. टंचाई उपाययोजनासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला असून सद्य:स्थितीत जिल्ह्यातील २६२ गावे आणि २७ वाड्यावर विहिरी, बोअरची ३६० अधिग्रहणे करण्यात आली आहे.तालुकानिहाय अधिग्रहणाची संख्या पाहिली असता नांदेड तालुक्यातील १२ गावांमध्ये १७ अधिग्रहणे करण्यात आली आहे. अर्धापूर ३५ गावांमध्ये ४०, मुदखेड २० गावांमध्ये ३५, भोकर ८ गावांमध्ये ८, उमरी ४ गावांमध्ये ५, हदगाव ५६ गावांमध्ये ८०, बिलोली १७ गावांमध्ये २२, नायगाव तालुक्यातील ४ गावांमध्ये ४, मुखेड १६ गावांमध्ये २४, कंधार २ गावांमध्ये २, लोहा ३२ गावांमध्ये ४०, किनवट ३६ गावांमध्ये ४४ तर माहूर तालुक्यातील २० गावांमध्ये ३८ अधिग्रहणे करण्यात आली आहेत.याबरोबरच लोहा तालुक्यातील वाड्यामध्ये १०, मुखेड ५, हदगाव ४, अर्धापूर आणि माहूर प्रत्येकी ३ तर किनवट तालुक्यातील २ वाड्यांवर जलस्त्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. प्रशासनाने संभाव्य उपाययोजना म्हणून जिल्ह्यात १४४७ अधिग्रहणे प्रस्तावित केली असून प्रस्तावित अधिग्रहणात सर्वाधिक १८४ अधिग्रहणांची संख्या मुखेड तालुक्यात आहे तर कंधार १५७, हिमायतनगर ८२, हदगाव १३८, भोकर १०२, लोहा ८६ किनवट तालुक्यात ११५ अधिग्रहणे प्रस्तावित असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.ग्रामीण भागात टँकरची वाढती मागणीपाणीटंचाईच्या झळा ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांना सोसाव्या लागत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मागणी येताच संबंधित ठिकाणी टँकर देण्यास सुरुवात केली आहे. सद्य:स्थितीत २७ गावे आणि २६ वाड्यांवर ८४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात १० शासकीय तर ७४ खाजगी टँकरचा समावेश आहे. मुखेड तालुक्यात सर्वाधिक २४ टँकर सुरू असून त्या पाठोपाठ अर्धापूर शहरात १७, नांदेड तालुक्यात १३ टँकरद्वारे ग्रामस्थांची तहान भागविण्यात येत आहे.जिल्ह्यात केवळ १६ टक्के जलसाठाजिल्ह्यात असलेल्या एकूण प्रकल्पांत केवळ १६.१९ टक्के जलसाठा शिल्लक उरला आहे. यात जिल्ह्यातील दोन मोठ्या प्रकल्पांत २३.१६६ दलघमी साठा शिल्लक आहे. जिल्ह्यात असलेल्या ९ मध्यम प्रकल्पांत ३७.७१, तीन उच्च पातळी बंधाऱ्यात २०.८३ आणि ८८ लघुप्रकल्पांत २४.८० दलघमी जलसाठा शिल्लक आहे. मोठ्या प्रकल्पातील मानार प्रकल्पात ५.२३ तर विष्णूपुरी प्रकल्पात ७.४० टक्के जलसाठा शिल्लक आहे.
नांदेड जिल्ह्यात टंचाईच्या झळा वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 1:06 AM
यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसाचा फटका नांदेडकरांना सोसावा लागत आहे. जलस्त्रोतातील पाणी आटू लागल्याने टँकरची मागणी वाढत असून सद्य:स्थितीत जिल्ह्यातील २६ वाड्या आणि २७ गावांमध्ये ८४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांत ३६० विहिरी, बोअरचे अधिग्रहणही केले आहे.
ठळक मुद्दे३६० अधिग्रहणे : २७ गावांची तहान टँकरवर