शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

माळेगाव यात्रेला वीजपुरवठ्याची अद्यापही जोडणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 12:47 AM

दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेला ४ जानेवारीपासून सुरुवात होत असून यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारी व यात्रेकरू डेरेदाखल झाले आहेत. मात्र, या ठिकाणी प्राथमिक सोयीसुविधांचीही वाणवा आहे़

माळेगाव : दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेला ४ जानेवारीपासून सुरुवात होत असून यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारी व यात्रेकरू डेरेदाखल झाले आहेत. मात्र, या ठिकाणी प्राथमिक सोयीसुविधांचीही वाणवा आहे़ त्यामुळे भाविक अन् यात्रेकरुंना अडचणींचा सामना करावा लागत आहे़ यात्रा दोन दिवसांवर येवून ठेपलेली असताना वीजपुरवठ्याची जोडणीही करण्यात आली नाही़जिल्हा परिषद, पंचायत समिती लोहा व ग्रामपंचायत माळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या यात्रेचे नियोजन केले जाते. माळेगाव यात्रेमध्ये राज्य व परराज्यांतून हजारो व्यापारी व यात्रेकरू डेरेदाखल झाले आहेत. मात्र ढिसाळ नियोजनामुळे यात्रेकरूंना पाणीपुरवठा व विद्युत पुरवठा मिळाला नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोन दिवसांपासून यात्रेसाठी दाखल झालेल्या व्यापाऱ्यांना रात्रभर अंधारात आपले साहित्य सांभाळण्याची वेळ येत आहे.दरवर्षी माळेगाव यात्रेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येतो़ विकासकामांचे नारळही फोडण्यात येते़ परंतु, अद्यापही या ठिकाणी यात्रेकरुंसाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे़ यात्रेत पिण्याचे पाणीही अद्याप उपलब्ध झाले नसल्यामुळे गैरसोय होत आहे़वीज पुरवठ्याअभावी यात्रेकरू व व्यापाºयांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. आढावा बैठकीमध्ये यात्रेकरूंना आठवडाभरापूर्वी विद्युत पुरवठा करण्याचे ठरले होते़ मात्र , आता यात्रा दोन दिवसांवर आली असताना येथील व्यापारी व यात्रेकरूंना विद्युत वितरण कंपनीकडून विद्युत पुरवठा करण्यात आला नाही़दरम्यान, यात्रेनिमित्ताने जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने ४ जानेवारी रोजी पशुसंवर्धनविषयक प्रदर्शनी स्टॉलचे उद्घाटन व दुग्ध स्पर्धा होणार आहे़ तर ५ जानेवारी रोजी पशुप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे़या प्रदर्शनात भाग घेण्यासाठी प्रत्येक पशुपालकाने आपल्या जनावरांची नोंदणी करणे आवश्यक आहे़ नोंदणीची वेळ सकाळी ८ ते ११ अशी ठेवण्यात आली असून नोंदणीशिवाय रिंगमध्ये प्रवेश दिला जाणार नसल्याचे जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे़ गुरुवारी देवस्वारीच्या एक दिवस अगोदर मोठ्या संख्येने यात्रेकरु माळेगावात डेरेदाखल होतात़वैशाली जाधवच्या उपस्थितीने रंगणार लावणी महोत्सव

  • माळेगाव यात्रेत ७ जानेवारी रोजी लावणी महोत्सव रंगणार आहे़ या महोत्सवासाठी यंदा सिनेतारिका तथा प्रसिद्ध नृत्यांगणा ढोलकीच्या तालावर फेम वैशाली जाधव यांना निमंत्रित करण्यात आले आहे़ त्यांच्यासह सुनीता लखनगावकर (मोडनिंब), आशारुपा परभणीकर, मीरा बबन पडसाळीकर, योगेश देशमुख (पुणे) यांचा संच आदींचा सहभाग असणार आहे़ दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास सुरु होणा-या या महोत्सवाला आ़ प्रताप पाटील चिखलीकर, आ़अब्दुल सत्तार, आ़ वसंतराव चव्हाण यांच्यासह पदाधिका-यांची उपस्थिती असणार आहे़
  • माळेगाव यात्रेसाठी जवळच असलेल्या लिंबोटी धरणातून पाणीपुरवठा केला जातो़ मात्र गेल्या तीन वर्षांपासून टंचाईकाळातील ७० लाख रुपये लाईट बिल थकीत असल्यामुळे विद्युत पुरवठा जोडण्यात आलेला नाही. सदरील बिलात पाच लाख रुपये जिल्हा परिषदेने भरले असून उद्यापासून पाणीपुरवठा चालू होणार आहे़-जि़प़सदस्य चंद्रसेन पाटील़
  • यात्रेमध्ये व्यापारी व यात्रेकरू मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून त्यांना सुविधा पुरवण्याचे काम जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरून चालू आहे़ व्यापा-यांना जागावाटप, पाणीपुरवठा, विद्युतपुरवठा सुरळीत करण्याचे काम चालू आहे. ३ जानेवारीपासून पाणीपुरवठा व विद्युत पुरवठा करण्यात येणार आहे़-गोविंदराव राठोड, सरपंच़
टॅग्स :NandedनांदेडReligious Placesधार्मिक स्थळेReligious programmeधार्मिक कार्यक्रम