सोमवारी १ हजार ६१० संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील १ हजार ५९६ अहवाल निगेटिव्ह, तर तीन अहवाल प्राप्त झाले. जिल्ह्यात कोरोनाची एकूण रुग्णसंख्या आता ९१ हजार २७७ वर पोहोचली आहे. आरटीपीसीआर तपासणीत दोन आणि ॲन्टिजन तपासणीत एक रुग्ण बाधित आढळला. हे दोन्ही रुग्ण महापालिका हद्दीतील आहेत.
जिल्ह्यात सध्या ७९ रुग्णांवर उपचार सुरू असून, चौघांची प्रकृती गंभीर आहे. सध्या विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात ५, जिल्हा रुग्णालय ३, देगलूर २, हदगाव २ आणि खासगी रुग्णालयात एका रुग्णावर उपचार केला जात आहे. गृहविलगीकरणात मनपा हद्दीत ४१, तर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतर्गत २५ रुग्ण उपचार घेत आहेत.
सोमवारी १७ रुग्णांनी कोरोनावर मातही केली आहे. लोहा कोविड रुग्णालयात ५, बिलोली ६, मुखेड ३ आणि जिल्हा रुग्णालयातून १, तर गृहविलगीकरणातील दोन रुग्णही कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१७ टक्क्यांवर पोहोचले आहे.