शहरं
Join us  
Trending Stories
1
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
2
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
3
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
4
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
5
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
6
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
7
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
8
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
9
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
10
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
11
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
12
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
13
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
14
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
15
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
16
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
17
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
18
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
19
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...

चोरट्यांचा हल्ला की घातपात? अंगणात झोपलेल्या घर मालकाची कुऱ्हाडीने वारकरून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 12:15 PM

नांदेड येथे रुग्णालयात उपचारादरम्यान झाला मृत्यू

- गोविंद टेकाळेअर्धापूर (नांदेड ): तालुक्यातील चाभरा येथे कुऱ्हाडीच्या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. जखमीला शासकीय रुग्णालय नांदेड येथे दाखल केले असता उपचारादरम्यान निधन झाले. परंतु, हा हल्ला चोरट्याने केला नसून प्राथमिक माहितीवरून घातपात असण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. 

अर्धापूर तालुक्यातील चाभरा येथे दि.९ सप्टेंबर शुक्रवार रोजी रात्री बालाजी दिगंबर काकडे हे घरासमोरील वसरीत (पत्राच्या घरात) झोपले होते. रात्री साडे अकराच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने बालाजीवर हल्ला केला. मानेत डोक्याजवळ उजव्या डोळ्याच्या बाजूस असे पाच ते सहा कुऱ्हाडीचे घाव केले. जबर हल्ला असल्याने बालाजी हे गंभीर जखमी झाले. त्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. घरात कमाईचे कुठलेही साधन नसून करता पुरुष गमावल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून प्रथम दर्शनी व्यक्तीच्या माहितीवरून एका व्यक्तीने हल्ला केला व पळून गेला आहे. चोरीचा कोणताही प्रयत्न दिसून आला नाही. घातपाताचा प्रकार असण्याची शक्यता असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती मनाठा पोलीस प्रशासनाने दिली आहे.

चोरांचा हल्ला नसून घातपाताची शक्यतागत काही दिवसांपासून तालुक्यात चोरांच्या आफवा मोठ्या प्रमाणात होत आहेत. सदर हल्ला चोरट्यांनी केला नसून घातपाताचा प्रकार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.सदर हत्ते प्रकरणी गुढ काय ? असी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड