नांदेड: आमदार माधवराव पाटील यांच्या हदगांव इथल्या घरात चोरीची घटना घडली आहे. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडले असून मोबाईल लंपास केले आहेत. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.
हदगाव शहरातील मुख्य वस्तीत असलेल्या आमदार जवळगावकर यांच्या घरात चोरटे शिरले होते. सर्वप्रथम त्यांनी सीसीटीव्ही ची तोडफोड केली.घरातील काही मोबाईल गेले चोरीला गेले आहेत. दिव्यांग बांधवांना वाटप करण्यासाठी ते मोबाईल आणण्यात आले होते. घरात कुणीही नसल्याचे पाहून चोरट्यानी डल्ला मारला आहे. आमदारांकडून पोलीसात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू आहे. आमदारांच्या घरात चोरी झाल्याने हदगाव मध्ये खळबळ उडाली आहे.