लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: पुणे येथील बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी पुढे आली होती़ त्यात नांदेड शहराने सुरक्षित शहर म्हणून मान पटकावण्याच्या नादात त्यावेळी पाच कोटी रुपये खर्च करुन तब्बल १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते़ परंतु या कॅमेºयाची देखभाल आणि दुरुस्तीवर होणाºया खर्चामुळे यातील अर्ध्याहून अधिक कॅमेरे बंदच राहत असून बसविण्यात आलेला हा तिसरा डोळा नावालाच उरला आहे़ सुरुवातीला अनेक गुन्हे उघडकीस आणण्याकामी या कॅमेºयांचा उपयोग झाला़ आता मात्र सर्रासपणे भर रस्त्यावर चोरीच्या घटना घडत आहेत़सेफसिटी प्रकल्पातून शहरात १०० कॅमेरे बसविण्यात आले होते़ या सर्व कॅमेºयांचे नियंत्रण पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षातून होते़ त्यामुळे शहरात येणारे प्रत्येक वाहन, मुख्य रस्त्यावरील प्रत्येक हालचालींना टिपणे पोलिसांना सोपे झाले होते़ जिथे सूचना देण्याची गरज असे तिथे त्वरित सूचनाही देता येत होत्या़ अवघ्या ११ महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला़या कॅमेºयांमुळे कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच विविध उत्सव, कार्यक्रम, गुन्हे व वाहतूक नियंत्रण, आपात्कालीन परिस्थितीत सूचना प्रसारणाचे काम प्रभावीपणे करता येणार होते़ परंतु या कॅमेºयाच्या दुरुस्ती आणि देखभालीवरुन मनपा आणि पोलीस प्रशासनामध्ये मध्यंतरी वाद उद्भवला होता़ त्यानंतर गणेशोत्सव, निवडणुका, इतर धार्मिक उत्सव अशा महत्त्वाच्या प्रसंगी त्या-त्या रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेºयांची तात्पुरती दुरुस्ती करण्यात येत होती़ परंतु आजघडीला निम्म्याहून अधिक कॅमेरे बंदच आहेत़शहरात वारंवार वाहतुकीची कोंडी होत असून वाहनचालक सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करीत आहेत़ परंतु या कॅमेºयांच्या मदतीने त्याबाबत कुठलीही कारवाई करण्यात येत नाही़ जवळपास तीन किमीपर्यंत होणारी प्रत्येक हालचाल टिपण्याची क्षमता असलेले हे कॅमेरे सध्या शोभेची वस्तू ठरत आहेत़शहरातील मुख्य रस्त्यावरुन गेल्या काही दिवसांत बॅग, मंगळसूत्र पळविल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत़ त्यामुळे मोठा गाजावाजा करुन उभारण्यात आलेल्या या सेफसिटी प्रकल्पाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे़या कॅमेºयांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करण्याची आवश्यकता आहे़ अन्यथा येत्या काही दिवसांत उरले-सुरले कॅमेरेही बंद पडतील़
तिसरा डोळा नावालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 1:16 AM
नांदेड: पुणे येथील बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी पुढे आली होती़ त्यात नांदेड शहराने सुरक्षित शहर म्हणून मान पटकावण्याच्या नादात त्यावेळी पाच कोटी रुपये खर्च करुन तब्बल १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते़ परंतु या कॅमेºयाची देखभाल आणि दुरुस्तीवर होणाºया खर्चामुळे यातील अर्ध्याहून अधिक कॅमेरे बंदच राहत असून बसविण्यात आलेला हा तिसरा डोळा नावालाच उरला आहे़ सुरुवातीला अनेक गुन्हे उघडकीस आणण्याकामी या कॅमेºयांचा उपयोग झाला़ आता मात्र सर्रासपणे भर रस्त्यावर चोरीच्या घटना घडत आहेत़
ठळक मुद्देपाच कोटींचा खर्च : बसविले होते १०० सीसीटीव्ही कॅमेरे