लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : कोरेगाव भीमा येथील दंगल प्रकरणातील मुख्य सूत्रधार संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले़ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शंभर टक्के शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात यावी, एस़सी़,एस़टी. प्रवर्गातील विद्यार्थ्यांची थकित शिष्यवृत्ती तात्काळ देण्यात यावी, राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा, ३ जानेवारीच्या महाराष्ट्र बंदच्या आंदोलनातील तरुणांवरील गुन्हे मागे घ्यावे व दंगलीत झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, एस़सी़,एस़टी अॅट्रासिटी अॅक्टसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार करावा, हदगाव तालुक्यातील आष्टी येथील विद्यार्थी योगेश जाधव याच्या मृत्यूची दंडाधिकारी चौकशी करुन अहवाल जाहीर करण्यात यावा तसेच सरकारने २०२१ मध्ये ओबीसी समाजाची जनगणना करावी, ओबीसी, व्हीजेएनटी वर्ग-१,२,३ व एसबीसी या प्रवर्गातील समाजाची त्यात गणना करण्यात यावी, रमाई घरकुल तसेच प्रधानमंत्री आवास योजनेची कामे तात्काळ सुरु करावीत आदी मागण्यांसाठी हे घंटानाद आंदोलन करण्यात आले़ त्यानंतर जिल्हाधिका-यांना निवेदन दिले़यावेळी नागेश सावंत, बाळासाहेब सोनकांबळे, प्रा़ राजू सोनसळे, भीमराव बेंद्रीकर, दिलीप जोंधळे, कैलास वाघमारे, विजयकुमार कांबळे, शरद सूर्यवंशी, अशोक कापशीकर, राजू वाघमारे, सय्यद इलियास, सतीश एडके, चंद्रमनी मांजरमकर, संजय मंडेला, बाळासाहेब डोंगरगावकर, रितेश जमदाडे, प्रतीक मोरे, सोपान वाघमारे यांची उपस्थिती होती़भोकरमध्येही घंटनादभोकर : कोरेगाव भीमा दंगलीतील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांच्या अटकेच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी येथील तहसील कार्यालयासमोर मंगळवारी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने करण्यात आलेल्या घंटानादने तहसील परिसर दणाणला होता.आंदोलकांनी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत घंटानाद केल्यानंतर तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यात भीमा कोरेगाव दंगलीतील बहुजनांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती द्यावी, शेतक-यांचा सातबारा कोरा करावा, शहरातील बौद्ध स्मशानभूमीतील अतिक्रमण काढून टाकावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या जागेवरील अतिक्रमण काढून टाकावे, १९८० पासून गायरान करणा-या शेतक-यांना कबाला द्यावा आदी मागण्यांचा समावेश आहे.निवेदनावर भारिपचे तालुकाध्यक्ष भीमराव भंडारे, अध्यक्ष दशरथ भदरगे, अॅड. विजयकुमार दुधारे, मानिका जाधव, राजू दांडगे, यु.एन.एडके, राजेश चंद्रे यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत.लोहा तहसील कार्यालयासमोर भारिपचे आंदोलनलोहा : भारिप बहुजन महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी लोहा तहसील कार्यालयासमोर तीन तास घंटानाद आंदोलन करून मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले़भीमा कोरेगाव पक्ररणातील संभाजी भिडे यांना अटक करावी, अॅट्रॉसिटी कायदा कठोर करावा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करावी, शेतक-यांचा सातबारा कोरा करावा आदी मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी उपविभाीगय अधिकारी प्रभोदय मुळे व तहसीलदार डॉ़आशिषकुमार बिरादार यांना देण्यात आले़यावेळी भारिपचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ जोंधळे, अशोक सोनकांबळे, प्रमोद धूतमल, नवनाथ शेळके, सुरेश जोंधळे, नामदेव तारू, नामदेव हंकारे, जळबा मोरताटे, मोहन सोनकांबळे, राज महम्मद मन्सुरी, चंद्रकांत गायकवाड, तुकाराम दाढेल आदी उपस्थित होते़
कोरेगाव भीमा प्रकरणी नांदेड जिल्ह्यात घंटानाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 12:28 AM