श्रीनिवास भोसले।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शासनाने सुरू केलेल्या पीक विमा योजनेमुळे शेतकºयांना बºयापैकी नुकसान भरपाई मिळत आहे़ परंतु, प्रशासनातील काही कामचुकार कर्मचारी आणि पीक विमा कंपनीकडे असलेल्या अपुºया मनुष्यबळाचा फटका शेतक-यांना बसत आहे़ पेरणीनंतर पावसाने दिलेली हुलकावणी, अतिवृष्टी, उघडीप आदी कारणांमुळे बहुतांश भागातील सोयाबीनसह कापूस, मूग, उडीद पिकांचे अतोनात नुकसान होते़ दरम्यान, मागील हंगामात जून, जुलैमध्ये चांगला पाऊस झाला आणि आॅगस्टमध्ये पावसाने चांगलीच उघडीप दिली़ त्यामुळे सोयाबीनचे हाती आलेले पीक करपून गेले़ यानंतर प्रत्येक तालुक्यातील शेतक-यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली होती़ परंतु, बहुतांश भागातील सोयाबीनच्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत़ त्याचा फटका शेतक-यांना बसला आहे़नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी सात तालुक्यांना सोयाबीनचा पीक विमा मिळालेला नाही़ यामध्ये नांदेड तालुक्यातील २१ हजार ५३ शेतक-यांनी सोयाबीनचा पीक विमा भरला होता़ तर भोकरमध्ये १२ हजार ५३५ शेतक-यांनी, धर्माबाद - ११ हजार ९६८, किनवट - ९ हजार २८१, मुदखेड - १५ हजार ९१, मुखेड - २१ हजार ५३ तर उमरी तालुक्यातील ९ हजार ९६१ शेतक-यांनी सोयाबीनचा पीक विमा भरला होता़ परंतु, एकाही शेतक-यांचा सोयाबीनचा पीक विमा मिळालेला नाही़जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांपैकी नायगाव, लोहा, कंधार तालुक्यांत सर्वाधिक पीक विमा मंजूर झाला आहे़ काही मंडळांमध्ये सोयाबीनसाठी हेक्टरी २८ हजार रूपयापर्यंत पीक विमा मिळत असल्याने त्या भागातील शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत़ परंतु, सात तालुक्यांतील हजारो शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत़शेतक-यांनी मागणी करूनही अनेक भागात पंचनामे झाले नाहीत. त्यास शासन, प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत़ त्यामुळे शेतक-यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले़---जिल्ह्यासाठी ४५३ कोटींचा पीक विमा मंजूरप्रधानमंत्री पीक विमा योजनेतून नांदेड जिल्ह्यातील ६ लाख ३ हजार ८८७ शेतक-यांना विविध पिकांसाठी ४५३ कोटी ८८ लाख १८ हजार ५७७ रुपयाचा पीक विमा मंजूर झाला आहे़ यात सर्वाधिक पीक विमा सोयाबीन उत्पादक २ लाख ८२ हजार २४७ शेतक-यांना ३५७ कोटी ६० लाख ५२ हजार ४०६ रुपये मिळणार आहेत़ आजघडीला बँकांमार्फत पीक विम्याची रक्कम वाटप करण्याचे काम सुरू झाले आहे़---नांदेड जिल्ह्यातील ८ लाख ५३ हजार २१८ शेतक-यांनी ४ लाख ५ हजार ५१२ हेक्टरवरील पिकांचा विमा भरला होता़ यापैकी ६ लाख ३ हजार ८८७ शेतक-यांचा विविध पिकांचा विमा मंजूर झाला आहे. नांदेड जिल्ह्यात उडदाच्या नुकसानीपोटी १ लाख २२ हजार ७१३ शेतक-यांना ३४ कोटी ५० लाख ५१ हजार ५५१ रुपये, कापसासाठी ३९ हजार २१९ शेतक-यांना ११ कोटी १७ लाख ५९ हजार ६५६ रुपये.---मुगासाठी १ लाख २४ हजार ३१६ शेतक-यांना ३४ कोटी ७० लाख ९९ हजार रुपये ज्वारीसाठी ३१ हजार १५७ शेतक-यांना ८ कोेटी ७८ लाख ७२ हजार ४५० रुपये तर तूर, चनासाठी ४ हजार ३९ शेतक-यांना ६ लाख ३१ हजार ३२० रुपये मिळणार आहेत. १० हजार ५६६ शेतक-यांनी तिळाचा विमा काढला होता. परंतु केवळ १९६ शेतक-यांचा पीक विमा मंजूर झाला असून त्यासाठी ३ लाख ५२ हजार १९३ रुपये मंजूर झाले.---जिल्ह्यात तालुकानिहाय मंजूर झालेली रक्कमअर्धापूर तालुक्यातील १५ हजार १७३ शेतक-यांना २ कोेटी १ लाख ९१ हजार ८१ रुपये, भोकर -१८ हजार ३१० शेतक-यांना २ कोटी २२ लाख २७ हजार ६२५ रुपये, बिलोली - २७ हजार ७७६ शेतक-यांना २५ कोटी ६० लाख ३९ हजार ९२४.देगलूर- ४६ हजार १०१ शेतक-यांना ४३ कोटी ८६ लाख ६८ हजार २९६ रुपये, हदगाव- ६६ हजार ६२३ शेतक-यांना ६८ कोटी ९२ लाख ८२ हजार ८१६ रुपये, हिमायतनगर- १८ हजार ५०८ शेतक-यांना ४ कोटी ३२ लाख ३८ हजार २९७ रुपये़कंधार- ९३ हजार ४५७ - ४८ कोटी ८० लाख ३० हजार ४७२ रुपये, किनवट- ११ हजार ४७५ शेतक-यांना ५३ लाख ५१ हजार ४७८ रुपये, लोहा- ९२ हजार २६३ शेतक-यांना ५८ कोटी ११ लाख १९ हजार ४४४ रुपये, माहूर- ११ हजार ९५२ शेतक-यांना १० कोटी २९ लाख १३ हजार २९१ रुपये, मुदखेड- ३ हजार ३५१ शेतक-यांना १ कोेटी २९ लाख ८ हजार ५४९ रुपये, मुखेड- १ लाख २६ हजार २६१ शेतक-यांना १३३ कोटी ९० लाख ७५ हजार ८२ रुपये़ नांदेड - १२६२ शेतक-यांना २४ लाख ४७ हजार ९२२ रुपये, नायगाव- ६७ हजार १७९ शेतक-यांना ५३ कोटी ६८ लाख १ हजार ५१० रुपये तर उमरी -४ हजार ९६ शेतक-यांना ५ लाख २२ हजार ७८१ रुपये मंजूर झाले आहेत़---दुर्लक्षाचा फटकानुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी करूनदेखील विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने हजारो शेतक-यांना आज पीक विम्यापासून वंचित रहावे लागत आहे़ शासनाने अनेक मंडळामध्ये बसविलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रामार्फत झालेल्या नोंदी घेवून नुकसानभरपाई देणे गरजेचे आहे़ विमा कंपनीकडे मनुष्यबळ नसल्याने योग्यवेळी पंचनामे होत नाहीत़ त्याचा फटका शेतक-यांना बसतो़-शिवाजी मोरे, शेतकरी प्रतिनिधी---संभाजी ब्रिगेड आंदोलनाच्या तयारीतनांदेडसह सात तालुक्यांतील सोयाबीन उत्पादक शेतक-यांना एक रूपयाही पीक विमा मिळाला नाही़ या तालुक्यातील अनेक मंडळातील आणेवारी ५० टक्क्यांच्या आत आहे़ तसेच ५१ ते ५५ पर्यंत आणेवारी असलेल्या भागातील शेतक-यांना हेक्टरी ८ ते १२ हजार रूपये मिळणे गरजेचे आहे़ परंतु, प्रशासनाच्या चुकीच्या नोंदीचा फटका शेतकºयांना बसत आहे़ या सर्व शेतक-यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी संभाजी ब्रिगेड लवकरच रस्त्यावर उतरणार आहे़-धनंजय सूर्यवंशी, जिल्हाध्यक्षसंभाजी ब्रिगेड, नांदेड़---नायगाव, लोह्यात सर्वाधिक रक्कमनांदेड जिल्ह्यातील लोहा, नायगाव, हदगाव, देगलूर आणि कंधार तालुक्यांत सर्वाधिक पीक विमा मंजूर झाला आहे़ तर भोकर, नांदेड तालुक्यात सर्वात कमी पीक विमा मंजूर झाला आहे़ त्याचबरोबर नायगाव तालुक्यातील काही मंडळात शेतक-यांना सोयाबीनच्या नुकसानीसाठी हेक्टरी २० ते २८ हजार रूपये मिळत विमा मंजूर झाल्याची माहिती आहे़
---चुकीची आणेवारीसोयाबीन नुकसानीनंतर काढलेली आणेवारी ब-याच शेतक-यांना मान्य नव्हती़ यासंदर्भात विद्यमान आमदार, माजी आमदार आणि शेतकरी संघटनांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून चुकीची आणेवारी झाल्याच्या तक्रारी केल्या होत्या़ परंतु, याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आज बहुतांश शेतक-यांना नुकसान होवूनदेखील विमा मिळत नाही़ दरम्यान, यावर्षी खरिपाच्या पेरणीसाठी शेतक-यांना कर्जबाजारी होवून बियाणे खरेदी करावे लागले़---साडेएकवीस हजार शेतकरीनांदेड तालुक्यातील २१ हजार ५३ शेतक-यांनी सोयाबीनचा पीक विमा भरला होता़ तर भोकरमध्ये १२ हजार ५३५ शेतक-यांनी, धर्माबाद - ११ हजार ९६८, किनवट - ९ हजार २८१, मुदखेड - १५ हजार ९१, मुखेड - २१ हजार ५३ तर उमरी तालुक्यातील ९ हजार ९६१ शेतक-यांनी सोयाबीनचा पिकविमा भरला होता़ परंतु, एकाही शेतक-यांचा पीक विमा मिळालेला नाही़
नांदेड : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी विविध पिकांचा विमा काढला़ परंतु, नुकसानीचे योग्य पंचनामे व नोंदी न झाल्याने लाखो शेतक-यांना पीक विम्यापासून वंचित रहावे लागले़ जिल्ह्यात सर्वाधिक पीक विमा सोयाबीनचा भरला गेला होता़ परंतु, जास्त आणेवारीचे कारण देत सात तालुक्यांना सोयाबीनच्या पीक विम्यातून वगळले आहे़ त्यामुळे हजारो शेतक-यांचे नुकसान झाले आहे़