लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: जिल्ह्यातील अनेक शाळांनी प्रलंबित शिष्यवृत्ती प्रस्तावांची हार्ड कॉपी व लिंकची पावती जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे दाखलच केली नाही़ त्यामुळे हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे़राज्य शासनाने २०१७-१८ पासून सर्व शिष्यवृत्ती योजनांचे प्रस्ताव महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी करण्याचे निर्देश शाळांना दिले आहेत़ त्यामुळे सामाजिक न्याय विभागाने ई-स्कॉलरशीप वेबसाईट बंद केली़ त्याच दरम्यान महाडीबीटी पोर्टलवर हजारो विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यांशी लिंक झाले नाही़ त्यामुळे प्रशासनाने आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणारी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, अनुसूचित जाती, भटक्या समाजासाठीच्या योजनांचे प्रस्ताव प्रलंबित ठेवले आहेत़ २०१६-१७ मधील हे प्रस्ताव प्रलंबित शिष्यृवत्तीच्या यादीत टाकण्यात आले़ याबाबत जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला विशेष सूचना देण्यात आल्या़त्यावर समाजकल्याण विभागाने ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले नाही़ त्यांचा समावेश प्रलंबित शिष्यवृत्तीत करुन त्यांच्या आॅनलाईन प्रस्तावांची हार्ड कॉपी व विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बँक खात्याशी लिंक करण्याचे निर्देश शाळांच्या मुख्याध्यापकांना दिले होते़ प्रलंबित शिष्यवृत्तीसाठी महा-ई-स्कूल पोर्टल सुरु करण्यात आले होते़ शाळांच्या प्रतिनिधींनी महा-ई-स्कूल पोर्टलचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या़ त्याचबरोबर हार्ड कापी व लिंकची पावती समाजकल्याण विभागात जमा करणे आवश्यक होते़, परंतु अनेक शाळांनी त्याबाबत चालढकल केली़ त्यामुळे हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे़ई-स्कॉलरशीप पोर्टल सुरु-कुंभारगावे४विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा शुल्क, निर्वाह भत्ता आदी लाभ देण्याचे प्रलंबित असल्याने ई-स्कॉलरशीप हे संकेतस्थळ मर्यादित कालावधीसाठी सुरु करण्यात आले आहे़ विद्यार्थ्यांचे प्रलंबित असलेले अर्ज संकेतस्थळावरुन १५ डिसेंबरपर्यंत समाजकल्याण विभागात पाठवावे़ प्रथम टप्प्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी २०१५-१६ साठी ३१ मार्च २०१६ तर २०१६-१७ करिता ३१ मार्च २०१७ पर्यंत आॅनलाईन अर्ज भरले आहेत, परंतु ज्यांना अद्याप शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नाही़ अशा विद्यार्थ्यांचे प्रलंबित अर्ज पाठवावेत़ २०१३-१४ ते आतापर्यंत सर्व शिष्यवृत्तीचा अहवाल व इतर माहिती शाळेने स्वत: काढून ठेवावी, असे आवाहन समाजकल्याण अधिकारी ए़बीक़ुंभारगावे यांनी केले आहे़
नांदेड जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी राहणार शिष्यवृत्तीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 1:05 AM
लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड: जिल्ह्यातील अनेक शाळांनी प्रलंबित शिष्यवृत्ती प्रस्तावांची हार्ड कॉपी व लिंकची पावती जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे ...
ठळक मुद्देबँक खात्याशी आधार लिंक नाही: हार्ड कॉपी सादर करण्यासही टाळाटाळ