शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

बामियानला पुन्हा धोका ? अफगाणिस्तानातील बौद्धस्थळांच्या सुरक्षतेसाठी युनिसेफने तातडीने निर्णय घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2021 4:12 PM

बामियान या ठिकाणी चौथ्या ते पाचव्या शतकात उभारण्यात आलेल्या दोन विशाल बौद्ध मुर्त्या २००१ मध्ये तालिबानचे नेते मोहम्मद उमर यांच्या सूचनेवरून मिर्झा हुसेन याने पंचवीस दिवस डायनामाईट लावून  नष्ट केल्या होत्या.

नांदेड- अफगाणिस्तानमध्ये तालिबानी शासन परतले आहे.  यामुळे त्याठिकाणी असलेल्या ऐतिहासिक बौद्ध स्थळांना पुन्हा एकदा धोका निर्माण झाला आहे. यावर गांभीर्याने विचार करत संयुक्त राष्ट्र संघाच्या युनिसेफ आणि  शांतता सेनेच्या मदतीने या बौद्धस्थळांना सुरक्षितता प्रदान करावी, असे आवाहन आंबेडकरवादी मिशनच्या युनिव्हर्सल बुद्धिस्ट संघाने युनिसेफकडे मेलद्वारे केली आहे.

बामियान या ठिकाणी चौथ्या ते पाचव्या शतकात उभारण्यात आलेल्या दोन विशाल बौद्ध मुर्त्या २००१ मध्ये तालिबानचे नेते मोहम्मद उमर यांच्या सूचनेवरून मिर्झा हुसेन याने पंचवीस दिवस डायनामाईट लावून  नष्ट केल्या होत्या. इसवी सनाच्या ५०७ मध्ये उभारण्यात आलेल्या ३५ मीटर उंचीची व इसवी सन ५५४ मध्ये उभारण्यात आलेली ५३ मीटर उंचीची या दोन विशालतम बुद्धमूर्ती तालिबान्यांनी नष्ट केल्याने जागतिक नुकसान झाले आहे.

मार्च २०२१ मध्ये त्या ठिकाणी लेझरच्या माध्यमातून ह्या मुर्त्या पर्यटकांना पुन्हा एकदा दाखवण्यासाठी प्रयत्न प्रारंभ करण्यात आले होते. गांधार शैलीतील या मुर्त्या व अजिंठा येथील नवव्या आणि दहाव्या गुंफेतील चित्र (मीरम शैली) मध्ये बरेच साम्य आढळते.२०१५ मध्ये बमियान या शहराची निवड दक्षिण आशिया सांस्कृतिक राजधानी म्हणून करण्यात आली होती. बामियान व अफगाणिस्तान मधील इतर आत्यंतिक महत्त्वाच्या बौद्ध स्थळांची सुरक्षितता करणे आवश्यक आहे. ही स्थळे केवळ बौद्ध धर्मीयांसाठीच नव्हे तर संपूर्ण मानवी इतिहासासाठी महत्वाची आहेत.  प्राचीनतम रेशीम मार्गावरील हा ऐतिहासिक वारसास्थळांची जपणूक होणे आवश्यक आहे. 

तालिबान्यांचा मागील कार्यकाळ पाहता उरलीसुरली ऐतिहासिक बौद्ध स्थळे नष्ट होण्याची भीती आहे. संयुक्त राष्ट्र संघाने युनिसेफ आणि शांती  सैनिकाच्या सहकार्याने या स्थळांची सुरक्षा करावी, अशी मागणी आंबेडकरवादी मिशन युनिव्हल बुद्धिस्ट संघाचे प्रमुख दीपक कदम यांनी युनिसेफच्या प्रमुखाकडे मेलद्वारे केली आहे. भारत सरकारने सुद्धा या बाबीकडे विशेष लक्ष देऊन बौद्धांच्या या ऐतिहासिक स्थळांची सुरक्षितता प्राधान्याने करण्याची मागणी संयुक्त राष्ट्र संघाकडे तात्काळ करावी अशी विनंती कदम यांनी केली आहे.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानNandedनांदेडBuddha Cavesबौद्ध लेणी