शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

पैनगंगा नदीवरील अपघातात तीन ठार, मृतामध्ये आ.अनिल गोटे यांच्या बंधूचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 5:01 PM

नागपुरवरून परभणीकडे जाणार्‍या एका कारला पैनगंगा नदीवर समोरून येणार्‍या भरदाव ट्रकने जोरदार  धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की कार नदीपात्रामध्ये जाऊन कोसळली. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. मयतामध्ये भाजपाचे आमदार अनिल गोटे यांचे धाकटया बंधू व भावजयीचा समावेश आहे.

ठळक मुद्दे कारला पैनगंगा नदीवर समोरून येणार्‍या भरदाव ट्रकने जोरदार  धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की कार नदीपात्रामध्ये जाऊन कोसळली.कारचे दरवाजे लाँक झाले होते, काचाही बंद होत्या त्यामुळे अपघातग्रस्ताना बाहेर पडता आले नाही

हदगाव (हिंगोली ), दि. २५ : नागपुरवरून परभणीकडे जाणार्‍या एका कारला पैनगंगा नदीवर समोरून येणार्‍या भरदाव ट्रकने जोरदार  धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की कार नदीपात्रामध्ये जाऊन कोसळली. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. मयतामध्ये भाजपाचे आमदार अनिल गोटे यांचे धाकटया बंधू व भावजयीचा समावेश आहे.हा अपघात शुक्रवारी दि.२५ रोजी हदगाव-उमरखेड रोडवरील पैनगंगानदीवर घडला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत ज्ञानेश्‍वर गोटे हे परभणी येथे भुमापन अधिकारी म्हणून कार्यरत असत. नागपुरवरून परभणीकडे निघाले असता, मराठवाडा-विदर्भाला जोडणार्‍या पैनगंगा पुलावर कार जात असताना समोरून येणार्‍या अज्ञात ट्रकने कारला जोराची धडक दिली. समोरून येणार्‍या ट्रकचा वेग इतका होता, की कार पुलावरून कोसळून नदीपात्रात जाऊन पडली. नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग नव्हता. त्यामुळे  कार पुढे जाऊ शकली नाही. 

अपघातात झाल्याचे या मार्गावरून जाणार्‍या वाहनचालकांनी पाहिले. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. तेथील नागरिक व पोलिसांच्या मदतीने  कारमधील लोकांना बाहेर काढण्यात आले. मात्र तत्पर्वूीच सर्वांचा जागीच मृत्यू झालेला. या वेळी कागदपत्रांची तपासणी केली, असता मयतांची ओळख पटू शकली. 

यात परभणी येथे भुमापन अधिकारी असलेले ज्ञानेश्‍वर उमराव गोटे त्यांची पत्नी रत्ना ज्ञानेश्‍वर गोटे, व चालकाचा समावेश आहे. मात्र चालकाचे नाव समजू शकले नाही.कारचे दरवाजे लाँक झाले होते, काचाही बंद होत्या त्यामुळे अपघातग्रस्ताना बाहेर पडता आले नसल्याचे पोलीस निरीक्षक केशव लटपटे यानी सांगीतले. गोटे यांच्या नौकरीचा कार्यकाळ आठरा महिने शिल्लक राहीला होता. त्याना एकुलती एक मुलगी आसुन ती मुबंई येथे राहते. 

दरम्यान एक ट्रक आर्णी च्या पोलीसानी पकडला असुन हदगाव पोलीसाचे एक पथक ट्रक आणण्यासाठी आर्णी ला रवाना झाले आहे.तसेच पोलिसांनी तिघांचे मृतदेह हदगाव येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.