नांदेड : येथील श्री सचखंड गुरूद्वारा बोर्डाच्या तीन सदस्यांची निवडणूक गुरुवारी घोषित करण्यात आली आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार २६ नोव्हेंबर पासून अर्ज करता येणार आहे. २८ डिसेंबर रोजी मतदान तर २९ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.नांदेड सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या तीन सदस्यांना निवडून देण्यासाठी मतदार यादी अंतिम करण्यात आली असून ही मतदार यादी २२ नोव्हेंबर रोजी घोषित करण्यात आली. या निवडणुकीसाठी नांदेडसह औरंगाबाद, चंद्रपूर, जालना, परभणी, बीड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यातील मतदार आहेत. १२ हजार ७१४ एकूण मतदारांपैकी ६ हजार ८७१ पुरुष तर ५ हजार ८४३ महिला मतदार आहेत. या निवडणुकीसाठी २६ नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. १ डिसेंबर पर्यंत उमेदवारी दाखल करता येईल. ३ डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्रांची छानणी होईल. ६ डिसेंबर पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. २८ डिसेंबर रोजी मतदान होईल. मतमोजणी त्या त्या केंद्रावर २९ डिसेंबर रोजी त्या त्या मतदान केंद्रावर केली जाईल. मतमोजणीचे संकलन व निकाल ३१ डिसेंबर रोजी घोषित केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले. या निवडणुकीसाठी ५२ मतदान केंद्र राहणार आहेत.दरम्यान, या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये काही बंजारा समाजातील मतदारांची नावे असल्याचा विषय न्यायालयात गेला होता. तो निकाली निघाला. २१५ मतदारांचा यादीमध्ये समावेश केल्यानंतर २२ नोव्हेंबर रोजी मतदार यादी अंतिम करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.या निवडणुकीसाठी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, नांदेड, बीड, लातूर ही संपूर्ण जिल्हे व चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा, कोरपणा व जीवती हे तालुके मतदार कार्यक्षेत्र राहणार आहे. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांची उपस्थिती होती.२६ नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणारनांदेड सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या तीन सदस्यांना निवडून देण्यासाठी मतदार यादी अंतिम करण्यात आली असून ही मतदार यादी २२ नोव्हेंबर रोजी घोषित करण्यात आली. या निवडणुकीसाठी नांदेडसह औरंगाबाद, चंद्रपूर, जालना, परभणी, बीड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यातील मतदार आहेत. १२ हजार ७१४ एकूण मतदारांपैकी ६ हजार ८७१ पुरुष तर ५ हजार ८४३ महिला मतदार आहेत. या निवडणुकीसाठी २६ नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.
गुरुद्वारा बोर्डाच्या तीन सदस्यांची निवडणूक घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 1:23 AM
या निवडणूक कार्यक्रमानुसार २६ नोव्हेंबर पासून अर्ज करता येणार आहे. २८ डिसेंबर रोजी मतदान तर २९ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल
ठळक मुद्दे२८ डिसेंबर रोजी मतदान १२ हजार ७१४ एकूण मतदार