सारखणी (जि़ नांदेड) : आमचे सरकार राज्यात आल्यास तीन महिन्यांत नोकरीचा अनुशेष भरून काढला जाईल. तसेच स्थानिक भूमिपूत्रांना नोकरीत ७५ टक्के प्राधान्य देण्याचा कायदा करू, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बुधवारी सारखणी येथे केले़राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा बुधवारी नियोजित वेळेपेक्षा तीन तास उशिरा पोहोचली़ यात्रेचे स्वागत आदिवासी बांधवांच्या ढेमसा नृत्य करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी अजित पवार तर उद्घाटक म्हणून खा़ डॉ़ अमोल कोल्हे, विरोधी पक्षनेते आ़ धनंजय मुंडे, प्रा़ अमोल मिटकरी यांची उपस्थिती होती़
धनंजय मुंडे यांनी युती सरकारवर कठोर टीका केली़ राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांना संपावर जाण्याची वेळ युती सरकारच्या काळात आली़ युती सरकारने दिलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची चेष्टा करणारी ठरली आहे. प्रास्ताविक आयोजक आ़ प्रदीप नाईक यांनी केले़ सभेला शीतल जाधव, समाधान जाधव, प्रकाश राठोड, मेघराज जाधव, दिनकर दहीफळे आदी उपस्थित होते.
सत्तेचा माज-कोल्हेखा़अमोल कोल्हे म्हणाले की, राज्यात सगळीकडे शिवस्वराज्य यात्रेचे जंगी स्वागत होत आहे़, दुसरीकडे भाजपाच्या यात्रेला जनता काळे झेंडे दाखवून जो निषेध करीत आहे तो सरकार विरोधातील रोष आहे़ देवांचा देव इंद्रदेव तर महाराष्ट्राचा राजा देवेंद्र असे फलक लावणे हा देव-देवतांचा अपमान असून सत्तेचा माज आहे, असा आरोप कोल्हे यांनी यावेळी केला.