अदवंत यांना मजविपची श्रद्धांजली
मराठवाडा जनता विकास परिषदेचे सरचिटणीस डॉ. शरद अदवंत यांचे २० मार्च रोजी निधन झाले. नांदेडात मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याची प्रतिक्रिया अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे, द.मा. रेड्डी, संभाजी शिंदे यांनी दिली.
चळवळीतील एक आधारस्तंभ कोसळला
नांदेड- प्राचार्य शरद अदवंत हे मनमिळाऊ, अभ्यासू, क्रियाशील, ज्ञानदान करणारे शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातील एक अग्रगण्य व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेली आहे. मराठवाडा विकास चळवळीतील एक आधारस्तंभ कोसळला आहे. अशा शब्दांत मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
ते म्हणाले, अदवंत यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी अनेक दशके काम केले. दृकश्राव्य माध्यमातून घेतलेल्या शोकसभेला प्रदीप देशमुख, प्रा. के.के. पाटील, प्रा. अशोक सिद्धेवाड, प्रा. दामोदर थोरात, जीवन देसाई यांची उपस्थिती होती. मराठवाड्याच्या विकासासाठी अखंड झटणा-या एका नि:स्वार्थी विचारवंताला आपण मुकलो आहोत, अशी प्रतिक्रिया शोकसभेत देण्यात आली.