शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

भरदिवसा पतसंस्थेत सशस्त्र दरोडा; पाठलाग करत नागरिकांनी एकास पकडले, दिला बेदम चोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2022 5:42 PM

एक दरोडेखोराने कॅशियरकडे जात तेथून २ लाख ४ हजार रुपयांची रोकड ताब्यात घेतली.

उमरी (जि. नांदेड) : तालुक्यातील सिंधी येथील कै. व्यंकटराव पाटील कवळे बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या शाखेत सहा दरोडेखोरांनी दिवसाढवळ्या दरोडा टाकला. तलवारींचा धाक दाखवत बँकेमधून २ लाख २ हजार ४९० रुपयांची रोकड पळविली. शनिवारी (दि.१) दुपारी दोन वाजेच्या सुमारास या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या दरोड्यात एक कर्मचारी किरकोळ जखमी झाला असून, पळून जाणाऱ्यांपैकी एका दरोडेखोरास पकडण्यात जमावाला यश आले आहे.

उमरी- नांदेड महामार्गावरील सिंधी गावाजवळ कै. व्यंकटराव पाटील कवळे बिगर शेती सहकारी पतसंस्थेची शाखा आहे. तीन दुचाकींवरून सहा दरोडेखोर या बँकेत घुसले. या सर्वांच्या हातात तलवारी व इतर शस्त्रे होती. तलवारीचा धाक दाखवून कॅशिअरजवळील दोन लाख २ हजारांची रोकड घेऊन हे दरोडेखोर पळून गेले. याचवेळी तलवारीने संगणकाची तोडफोड केली व एका कर्मचाऱ्यास जखमी केले. रोकड घेऊन दुचाकीवरून पळून जात असताना घाई गडबडीत एक दरोडेखोर खाली पडला. यावेळी काही कर्मचारी व जमलेल्या नागरिकांनी पाठलाग करून त्याला पकडले. मनजितसिंह किशनसिंह शिरपल्लीवाले (वय २६, रा. नंदिग्राम सोसायटी, नांदेड), असे पकडलेल्या दरोडेखोराचे नाव आहे. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या, तसेच आजूबाजूच्या लोकांचा मोठा जमाव घटनास्थळी जमला. दरोडेखोरास जमलेल्या जमावाने पोलिसांच्या हवाली केले.

दुचाकीवरून पडून एक दरोडेखोर जखमीघटनेची माहिती मिळताच उमरी येथील पोलीस निरीक्षक मोहन भोसले, नांदेड येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मनजित सिंह हा दरोडेखोर पळून जाताना मोटारसायकलवरून पडल्याने जखमी झाला असून, पोलिसांनी त्यास उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटना घडताच इतर पाच दरोडेखोर दुचाकीवरून परिसरातील गावांच्या दिशेने पळून गेले. सायंकाळी उशिरापर्यंत या दरोडेखोरांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. काँग्रेसचे माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांची ही पतसंस्था असून, नागरिकांमध्ये या घटनेमुळे दहशत पसरली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड