शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

थरारक ! मुखेडमध्ये बाईकवर सिनेस्टाईल पाठलागकरून तरुणावर गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 7:25 PM

firing on a young man in Mukhed मुखेड तालुक्यातील निवळी फाटा येथे भरदिवसा गोळीबाराची घटना

- दत्तात्रय कांबळे

मुखेड :  तालुक्यातील निवळी फाटाजवळील गणपती मंदिराजवळ एका दुचाकीस्वाराने  ३२ वर्षीय तरुणाचा पाठलाग करून त्यावर गोळीबार केल्याची थरारक घटना मंगळवारी सकाळी ११:४५ वाजेच्या सुमारास घडली. तिरूपती रानबा  पापुलवाड असे गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

तिरूपती रानबा  पापुलवाड हा दुचाकीवरून (  एम.एच.२४ ए.पी.३१९४ )  देगलुर तालुक्यातील करडखेल येथील मित्रांना भेटून परत निवळी या मुळगावी येत होता. निवळी फाटाजवळील गणपती मंदिराजवळ येताच पाठीमागून आलेल्या एका दुचाकीस्वाराने त्याच्यावर गोळीबार केला. एक गोळी उजव्या खांद्याला लागल्याने तिरुपती गंभीर जखमी झाला. त्यास मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे प्राथमिक उपचार करून त्यास नांदेड येथे अधिक उपचारासाठी रवाना करण्यात आले.

दरम्यान, या घटनेमागे कोण आहे ? गोळीबाराचे कारण अद्याप पुढे आले नसून पोलीस तपास सुरु आहे. सिनेस्टाईल पाठलागकरून केलेल्या गोळीबाराच्या या घटनेने संपूर्ण तालुक्यात  भितीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी अप्पर पोलिस अधिक्षक निलेश मोरे,उपविभागीय पोलिस अधिकारी  सचिन सांगळे, एलसिबिचे द्वारकादास चिखलिकर, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, स.पो.नि कमलाकर गड्डीमे  यांनी पाहणी केली. 

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी