लग्नसराई ही एप्रिल- मे या दोन महिन्यातच असते. या दोन महिन्यात लग्नतारखा व विवाह मुहूर्त होते. अगोदरच सहा महिन्यापासून वधू वरपित्यांनी विवाहाची तारीख निश्चित करून मंगल कार्यालय बुक केले हाेते. लग्नसराईची लगबग व धावपळही सुरू हाेते. मार्चअखेर व एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोना संसर्गाबाबत जनजागृती वाढली. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी लॉकडाऊन व कडक निर्बंध लागू करण्यात आले. लॉकडाऊनचा वाढता कालावधी वधुवर पित्यांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. जिथे घराच्या बाहेर निघण्याची सोय नाही, त्या ठिकाणी विवाह कसे लावायचे. अनेकांनी पत्रिका, कपड्यांचे बस्ते व विविध प्रकारची तयारी केली होती. वधुवरही आपल्या परीने तयारी लागले होते. मात्र कोरोनाने त्यांच्या आनंदावर विरजन पडले. ज्या हातावर मेहंदी लावायची होती, त्याच हातावर आता सॅनिटायझर लावण्याची वेळ आली आहे.
लग्नाची घाई करू नका-
चौकट- अनेक वरवधू पिता लपून छपून विवाह आयोजित करत आहेत. पुढील काही महिन्यात मुहूर्त नाहीत, असा चुकीचा समज करून विवाह समारंभ आयोजित केल्यामुळे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. पुढील काळात अनेक मुहूर्त असून नागरिकांनी विवाह मुहूर्ताची घाई करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.