नांदेड : शौचालय बांधकामाची माहिती देण्यास गेलेल्या बीडीओना ग्रामस्थांनी पाणी प्रश्नी अचानक घेरले. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी आक्रमक होत बीडीओंना अर्धातास ग्रामपंचायत कार्यालयातच कोंडून ठेवले. हदगाव तालुक्यातील सावरगाव (माळ) येथील या घटनेने हागणदारी मुक्तीचे 'टार्गेट' पूर्ण करण्यास गेलेल्या बीडीओची चांगलीच पंचायत झाली.
हदगाव तालुक्यातील सावरगाव (माळ) येथे शौचालय बांधकामाची माहिती देण्यासाठी बिडीओ सुभाष धनवे काही अधिका-यांसह आज सकाळी आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ जमले होते. धनवे यांनी माहिती देण्यास सुरु करताच अचानक ग्रामस्थांनी शौचालय सोडून पाणी प्रश्नावरून घेरले. आधी पिण्याचे पाणी द्या मग शौचालयावर बोला असा पवित्रा घेत त्यांनी धनवे यांना निरुत्तर केले. त्यांच्या हातातले माईक हिसकावत त्यांना ग्रामपंचायत कार्यालतात डांबून ठेवले. यावेळी त्यांच्या सोबत आलेले स्वच्छता दूत माधव पाटील यांनी स्वतःची सुटका करत गावातून पळ काढला. अर्ध्यातासानंतर ग्रामसेवक व विस्तार अधिकारी यांनी संतप्त ग्रामस्थ कार्यालयातून जाताच त्यांची सुटका केली.
काय आहे ग्रामस्थांचे म्हणणे या गावाची लोकसंख्या पाच हजार आहे. गावातील पाणी फ्लोराइड युक्त असल्याने पिण्यासाठी येथे शुध्द पाणी नाही. दीड कोटीची पाणी पुरवठा योजना झाली तरीही गावातील नळाला पाणी आले नाही.यामुळे ग्रामपंचायतने आरओ मशिन बसवून एका कुटुंबाला ५ रुपयामध्ये 20 लिटर पाण्याचा कोटा दिला आहे. यातच भारनियमन वाढल्याने पाणी शुद्ध होण्यास वेळ लागत असल्याने ग्रामस्थ वैतागले आहेत. यामुळे एकीकडे पिण्याचे पाणी नाही आणि अधिकारी शौचालय बांधण्यासाठी दबाव आणतात या समाजातून ग्रामस्थांनी आक्रमक होत हे पाउल उचले.
ग्रामस्थ प्रतिसाद देत नाहीतझालेल्या प्रकारावर बोलताना बीडीओ धनवे म्हणाले, एकीकडे शौचालय बांधकाम करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी दबाव आणतात तर दुसरीकडे ग्रामस्थ प्रतिसाद देत नाहीत.