आयटीएम कॉलेजमध्ये पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. मंगळवारी दुपारी २ वाजता भक्ती लॉन्स येथे नांदेड, हिंगोली, लातूर, परभणी या चार जिल्ह्यांची आढावा बैठक आयोजित केली आहे. या कार्यक्रमांना महाराष्ट्राचे प्रभारी एच.के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, वर्षाताई गायकवाड, खा. सुरेश धानोरकर, शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, बसवराज पाटील आदी नेते प्रामुख्याने उपस्थित राहतील, असेही त्यांनी सांगितले.
चौकट
मनपाला दीडशे कोटी
भरपूर प्रमाणात पाऊस होऊनही मशीनरी खराब झाल्याने नांदेडकरांना दररोज पाणीपुरवठा करता येत नाही. त्यामुळे नवीन मशीनरी खरेदी व देखभाल दुरूस्ती आणि अन्य विकासकामांसाठी नांदेड महापालिकेला दीडशे कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आगामी काळात नांदेडकरांना दररोज पाणीपुरवठा करणे शक्य होईल, असे अशोकराव चव्हाण यांनी सांगितले.
अवैध धंद्यांना विरोधच
वाळू, गुटखा, मटकामाफियांना नेहमीच विरोध केला असून अशा प्रकारच्या माफियांविरोधात कारवाई करण्याचे काम पोलिसांसह महसूल विभागाचे आहे. त्यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता आपले कार्य पार पाडावे, अशा सूचना केल्या असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.