नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या वन महोत्सव २०१९ कार्यक्रमांतर्ग ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा ६ जुलै रोजी सकाळी १०.०० वाजता विद्यापीठ परिसरामध्ये राज्याचे पर्यावरणमंत्री तथा पालकमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. यावेळी कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरामध्ये सामाजिक वनीकरण विभाग यांच्या सहकार्याने दहा हेक्टर परिसरामध्ये जैवविविधता उद्यान निर्मितीचे काम चालू करण्यात आलेले आहे. या उद्यानात २५ हजार सागवान वृक्ष रोपांची लागवड, संगोपन व वन्यजीवांचे संवर्धन करण्यात येणार आहे. सामाजिक वनीकरण आणि विद्यापीठातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून जैवविविधता उद्यान आणि विद्यापीठ परिसरामध्ये २५०० रोपटे लावून त्यांचे तीन वर्षे संवर्धन करण्यात येणार आहे.नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार, खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, हिंगोलीचे खा. हेमंत पाटील, लातूरचे खा. सुधाकर श्रुंगारे, महापौर दीक्षा धबाले, आ.सतीश चव्हाण, आ.विक्रम काळे, आ. अमरनाथ राजुरकर, आ.राम पाटील रातोळीकर, आ.डी.पी.सावंत, आ.सुभाष साबणे, आ. प्रदीप नाईक, आ.वसंतराव चव्हाण, आ.अमिता चव्हाण, आ.नागेश पाटील आष्टीकर, आ.तुषार राठोड, मुख्यवनसंरक्षक (प्रा.)औरंगाबादचे पी.के.महाजन, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि मनपाचे आयुक्त लहुराज माळी आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.१ जुलै ते ३० सप्टेंबर या दरम्यान राज्यामध्ये राबविण्यात येणाºया ‘वन महोत्सव २०१९’ कार्यक्रमातंर्गत ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमामध्ये प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांसह नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. आर. एम. मुलाणी, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी केले आहे.कार्यक्रमानिमित्त सुटी रद्दवन महोत्सव २०१९ कार्यक्रमातंर्गत ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ ६ जुलै रोजी विद्यापीठ परिसरामध्ये होत असल्यामुळे पहिला शनिवारची सुट्टी रद्द करण्यात आलेली आहे. सदर दिवशी विद्यापीठाचे संपूर्ण कामकाज विद्यापीठ उपकेंद्र, लातूर, परभणी आणि न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली वगळून नियमित सुरु राहील असे डॉ. मुलाणी यांनी कळविले आहे.
विद्यापीठात आज वन महोत्सवनिमित्त वृक्ष लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 12:47 AM
महाराष्ट्र शासनाच्या वन महोत्सव २०१९ कार्यक्रमांतर्ग ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा ६ जुलै रोजी सकाळी १०.०० वाजता विद्यापीठ परिसरामध्ये राज्याचे पर्यावरणमंत्री तथा पालकमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. यावेळी कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
ठळक मुद्देमहाराष्ट शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा आज प्रारंभ