शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

नायगाव, भोकरसह नांदेडमध्ये आज सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 12:58 AM

केंद्र आणि राज्य सरकारकडून जनतेवर अन्याय सुरु आहे. या अन्यायाला वाचा फोडून जनसामान्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरु आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : केंद्र आणि राज्य सरकारकडून जनतेवर अन्याय सुरु आहे. या अन्यायाला वाचा फोडून जनसामान्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरु आहे. २६ रोजी सकाळी १० वा. नरसीहून यात्रेचा प्रारंभ होणार असून सकाळी १०.३० ते १२ या वेळेत नायगाव येथे जाहीर सभा, १२ ते १२.४५ हा वेळ राखीव असून १२.४५ वाजता या यात्रेचे भोकरकडे प्रयाण होणार आहे. दुपारी ३ ते ४.३० या वेळात भोकर येथे जाहीर सभा होईल. त्यानंतर यात्रा ४.३० वा.नांदेडकडे प्रयाण करणार आहे. सायं. ६ वाजता जनसंघर्ष यात्रेचे सिडको येथे आगमन होईल. सिडकोहून ही यात्रा दूधडेअरीमार्गे माकंर्डेय चौक, धनेगाव चौक, वाजेगाव चौक, जुना पूल, देगलूर नाका, बाफना, भगतसिंग रोड मार्गे जुना मोंढा टॉवर, गुरुद्वारा चौक, महावीर चौक, वजिराबाद भागातील मुथा चौक, कलामंदिर, शिवाजीनगर, आयटीआय, श्रीनगर, वर्कशॉपमार्गे अशोकनगर, भाग्यनगर, आनंदनगर चौकमार्गे महादेव दालमील, व्हीआयपी रोड अशी फिरुन या यात्रेचे नवा मोंढा मैदानावर जाहीर सभेत रुपांतर होणार आहे. सायं. ७ ते १० या वेळेत नवा मोंढा मैदानावर जाहीर सभा होणार आहे. २७ रोजी ही यात्रा सकाळी ९ वा. नांदेडहून निघेल. ९.३० वा. अर्धापूर, लहान, तामसामार्गे दुपारी १ वा. हदगाव येथे जाणार असून हदगाव येथे जाहीर सभा झाल्यानंतर या यात्रेचे प्रस्थान हिंगोली जिल्ह्याकडे होणार आहे.दरम्यान, नांदेडमधील नवीन मोंढा मैदानावर सायंकाळी सात वाजता होणाऱ्या जाहीर सभेची काँग्रेसच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून ही सभा अभूतपूर्व होण्याची शक्यता आहे. जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने अवघे नांदेड शहर काँग्रेसमय झाले आहे.यात्रेमुळे नांदेडमधील वाहतूक मार्गात बदलनांदेड शहरात शुक्रवारी काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा येत आहे. यात्रेच्या निमित्ताने शहराच्या विविध भागातून रॅली निघणार आहे. रॅलीमुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये तसेच कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शहरातील पर्यायी मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. यानुसार वर्कशॉप टी पाँईट ते आयटीआय, फुलेमार्केट, कुसुमताई चौक, एसटी ब्रीज,कलामंदिर, वजिराबाद चौ रस्ता या मार्गावरील वाहतूक सायंकाळी सहा ते दहा या वेळेत पूर्णपणे बंद राहणार आहे. वाहतुकीसाठी पर्यायी बदल म्हणून तिरंगा चौक ते पोलीस मुख्यालय समोरुन पोलीस चौकीकडून खडकपु-याकडे जाणारा लालवाडी अंडरब्रीज, गणेशनगर वाय पाँईट, पावडेवाडीनाका चालू राहील. तसेच वर्क टी पाँईट ते भाग्यनगर कमान, आनंदननगर चौक, नाईक चौक, महाराणा प्रताप चौक,रेल्वे ओव्हर ब्रीज, बाफना टी पाँईट, देगलूरनाका, वाजेगाव हा मार्ग सुरु राहील.

टॅग्स :NandedनांदेडCongress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्रा