ओबीसीचे राजकीय आरक्षण जाण्यामध्ये सध्याचे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार जवाबदार आहे. ओबीसीला सत्तेपासून वंचित ठेवण्याचा हा भाजपचा घाट असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या वतीने या बाबीचा निषेध व्यक्त करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण व प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठा सहभाग घ्यावा, असे आवाहन महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जि. प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर, उपमहापौर मसूदखान, जि. प.चे शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, समाजकल्याण सभापती ॲड. रामराव नाईक, कृषी सभापती बाळासाहेब रावणगावकर, महिला व बालकल्याण सभापती सुशीला बेटमोगरेकर, स्थायी समिती सभापती स. वीरेंद्रसिंघ गाडीवाले, महिला व बालकल्याण सभापती संगीता पाटील डक, उपसभापती गीतांजली कापूरे, शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किशोर स्वामी, सिडको ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद कांचनगिरे, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष शमीम अब्दुल्ला, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कविता कळसकर, शहराध्यक्षा अनुजा तेहरा, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रोहिदास जाधव, सेवादल जिल्हाध्यक्ष आनंदराव गुंडले, सेवादल शहराध्यक्ष लक्ष्मीकांत गोणे, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष गंगाधर सोंडारे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू कोंढेकर, शहराध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे, प्रवक्ते संतोष पांडागळे, मुन्तजीब, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे यांनी केले आहे.