नांदेड : गेल्या पंधरा दिवसात सोमवारी पहिल्यांदाच रुग्ण संख्या शंभरच्या खाली आहे़ त्यासाठी तपासणीची संख्या कमी झाल्याचेही कारण आहे़ सोमवारी ५९ बाधित रुग्ण आढळले असून मृत्यूची संख्याही आज निरंक आहे़ जिल्ह्यात आजपर्यंत ३ हजार ३५६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून १२० जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे़
गत महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत़ दररोज सरासरी सव्वाशे ते दीडशे बाधित रुग्ण आढळून येत होते़ त्यामुळे रुग्णांची संख्या साडे तीन हजारांच्या जवळ पोहचली़ सोमवारी प्रशासनाला ३६९ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते़ त्यापैकी २७४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते़ आरटीपीसीआरद्वारे झालेल्या तपासणीत नांदेड मनपा क्षेत्र १२, लोहा २, उमरी १, भोकर २, कंधार १, नायगांव ४, हिंगोली १, नांदेड ग्रामीण ४, देगलूर १, हदगांव ८, किनवट ८, मुखेड २, परभणी १ तर अँटीजेन किट्सद्वारे केलेल्या तपासणीत नांदेड मनपा क्षेत्र २, मुखेड १, बिलोली २, किनवट ५ आणि मुदखेड येथे एक बाधित रुग्ण आढळून आला आहे़
सध्या १ हजार ४४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ त्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णूपुरी १७३, पंजाब भवन ५५२, जिल्हा रुग्णालय ४०, नायगांव ३९, बिलोली २४, मुखेड ११५, देगलूर ११२, लोहा ८, हदगांव ५०, भोकर १०, कंधार १३, धर्माबाद ८, किनवट ४२, अर्धापूर २०, मुदखेड १३, हिमायतनगर २०, माहूर १६, आयुर्वेदीक रुग्णालय ३१, बारड ४, खाजगी रुग्णालय १४३, औरंगाबाद ५, निजामाबाद १ आणि हैद्राबाद येथे एका रुग्णाला संदर्भित करण्यात आले आहे़ दरम्यान परभणी, हिंगोली, यवतमाळ यासह इतर जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी नांदेडात येत आहेत़ .
१४७ जणांनी केली कोरोनावर मातसोमवारी १४७ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली़ त्यात विष्णूपुरी येथील रुग्णालय २, नायगांव ३१, देगलूर १३, कंधार १, खाजगी रुग्णालय १५, किनवट ५, मुखेड ४, पंजाब भवन ७० आणि धर्माबाद कोविड सेंटरमधील पाच रुग्णांचा समावेश आहे़ आजपर्यंत १ हजार ७७९ जणांनी कोरोनावर मात केली आहे़ दरम्यान, शहरातील पंजाब भवन, विष्णुपूरी येथील रुग्णालय हाऊसफुल झाले असून, प्रशासनाकडून कोविड सेंटरसाठी इतर जागांचा शोध सुरु आहे़