लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : ढगाळ वातावरणामुळे स्वाईन फ्लू जिल्ह्यात पाय पसरत असल्याचे चित्र असून, आजवर देगलूर, मुखेड व अर्धापूर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा या आजाराने बळी घेतला असून, स्वाईन फ्लूची बाधा झालेल्या सात रुग्णांवर विष्णूपुरीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत़पावसाळा आणि त्यातच ढगाळ वातावरण यामुळे स्वाईन फ्लु पसरत असल्याचे दिसून येते़ या आजाराच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन केलेला आहे़ या कक्षाच्या माध्यमातून जानेवारीपासून ४ आॅक्टोबरपर्यंत ४ हजार २७२ रुग्णांची तपाासणी करण्यात आली आहे़ त्यातील प्राथमिक अवस्थेत संशयीत म्हणुन निदान झालेल्या ६८ रुग्णांना औषधी देण्यात आली़ तर ५५ रुग्णांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते़ या प्रयोग शाळेने दिलेल्या अहवालावरुन १० जणांना स्वाईन फ्लूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले़ त्यातील तीघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला़ हे तीघे देगलूर, मुखेड आणि अर्धापूर तालुक्यातील होते़ उर्वरीत सात जणांवर सध्या विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे़ दरम्यान, स्वाईन फ्ल्यू म्हणून प्रतिबंधक औषधे दिली जातात़ तसेच या आजाराचा संसर्ग होवू नये म्हणून टामी फ्ल्यू किंवा रिलेंझा ही औषधी देण्यात येतात़ ही औषधे विषाणूचे पुनरु उत्पादन थांबवतात़
नांदेडमध्ये स्वाईन फ्लुच्या ७ रुग्णांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 12:37 AM