शिवराज बिचेवार।नांदेड : विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गेल्या दीड महिन्यांपासून औषधांचा प्रचंड तुटवडा आहे़ औषध खरेदीचा विषय हाफकीनकडे गेल्यानंतर रुग्णालयाला औषध पुरवठाच करण्यात आला नाही़ त्यामुळे मोजकेच पैसे घेवून मोठ्या आशेने शासकीय रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना पदरचे पैसे खर्च करुन अत्यावश्यक औषधीही बाहेरुन खरेदी करण्याची वेळ येत आहे़विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात नांदेड जिल्ह्यासह शेजारील परभणी, हिंगोली, लातूर, यवतमाळ यासह तेलंगणातून मोठ्या प्रमाणात दररोज रुग्ण उपचारासाठी येतात़ रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात जवळपास दिवसाकाठी दोन हजार रुग्णांची नोंदणी होते़ त्यासाठी या ठिकाणी अत्याधुनिक सोयीसुविधाही उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत़ परंतु योग्य देखभाल अन् दुरुस्तीअभावी या रुग्णालयाला अवकळा आली आहे़ त्यात गेल्या दीड महिन्यांपासून रुग्णालयात औषधांचा प्रचंड तुटवडा आहे़ हाफकीनकडे औषध खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत़विशेष म्हणजे त्यासाठी हाफकीनकडे पुरेसा कर्मचारी वर्गच नाही़ त्यात संचालकाचे पदही रिक्त आहे़ त्यामुळे औषध खरेदीचा बट्टयाबोळ झाला असून राज्यभरातील रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा जाणवत आहे़ त्यात नांदेडातील रुग्णालयात तर अँटीबायोटिक, युरीन बॅग, टि़टी़इंजेक्शन यासह २ आणि ५ एमएलचे इंजेक्शन आदी अनेक औषधी रुग्णांना बाहेरील औषधी दुकानांवरुन खरेदी करावी लागत आहे़दररोज लागणारी जवळपास २० हून अधिक औषधीच या ठिकाणी नसल्याची माहिती आहे़ त्यामुळे पंचवीस पैशांच्या रॅन्टॅक या गोळीचाही समावेश आहे़ त्यामुळे डॉक्टरांकडून तशी चिठ्ठी लिहून दिली जात आहे़ त्यामुळे गाठीशी मोजके पैसे गावाकडून येणाºया गरीब रुग्णांची मोठी पंचाईत होत आहे़ औषधी खरेदी केल्यास जेवणाचेही पैसे त्यांच्या पदरला राहत नसल्याचा यक्षप्रश्न त्यांना पडत आहे़गेल्या दीड महिन्यांपासून हा प्रकार सुरु आहे़ खुद्द डॉक्टरच अमुक-अमुक औषधी दुकानातून औषध खरेदी करण्यासाठी बाध्य करीत आहेत़ त्यामुळे संबधित डॉक्टर आणि औषध विक्रेत्यांचे चांगले फावत असले तरी, गरीब रुग्णांची मात्र पिळवणुक होत आहे़ त्यामुळे पैसे खर्च करुन गावाकडे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी का यावे? असा प्रश्न या रुग्णांना पडत आहे़
औषधी पुरेशा प्रमाणातरुग्णालयात सध्या औषधांचा तुटवडा नाही़ आमच्या स्तरावर आम्ही औषधांची खरेदीही केली आहे़ काटकसर करुन आम्ही औषधांचा वापर करीत आहोत़ नियमानुसार आम्हालाही औषध खरेदी करता येते़ त्यामुळे औषधे नाहीत असे होवू शकत नाही़ पॅरॉसिटामॉल या जवळपास दीड लाखांवर गोळ्या व इतर अत्यावश्यक सर्व औषधी आहे़-डॉ़चंद्रकांत मस्के, अधिष्ठाता, नांदेड
डॉक्टरांकडे औषध दुकानदारांचे लेटरपॅडरुग्णालयात काही डॉक्टरांकडे रुग्णालयाबाहेर असलेल्या काही औषधी दुकानांचे लेटरपॅडच आढळून आले़ औषधी दुकानाचे नाव असलेल्या लेटरपॅडवर प्रिस्क्रीप्शन लिहून दिल्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांना त्याच दुकानातून औषधी खरेदी करण्यास सांगण्यात येत आहे़ त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर आणि औषध विक्रेत्यांचे संगनमताने गरीब रुग्णांची लुट करण्यात येत आहे़पैसे औषधातच गेले आता खायचे काय?परभणी येथील शेतकरी धोंडीबा पवार यांनी आपल्या पत्नीला रुग्णालयात दाखल केले आहे़ गेल्या चार दिवसात त्यांनी पत्नीसाठी साडे तीन हजार रुपयांची औषधी बाहेरुन आणली आहे़ त्यामुळे आता त्यांच्याजवळ एकवेळच्या जेवणाचेही पैसे नसल्याची अगतिकता त्यांनी व्यक्त केली़ तसेच गावाकडून नातेवाईकाला हातउसने पैसे घेवून येण्यास सांगितल्याचेही ते म्हणाले़