सहसंचालकांना निवेदन
नांदेड : बी. एड्.च्या विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या जागा वाढवून देण्याची मागणी केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल राठोड यांनी उच्चशिक्षण विभागाच्या सहसंचालकांकडे केली आहे. कोरोनामुळे प्रवेश प्रक्रिया लांबली असून, शासनाने जागा कमी केल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला असून, विद्यार्थी हित लक्षात घेत जागा वाढविण्याची गरज आहे.
शेतकऱ्यांचे नुकसान
नांदेड : भोकर तालुक्यातील भोसी परिसरातून गेलेल्या इसापूर उजव्या कालव्यातून जास्तीचे पाणी सोडले गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात शेतकरी संतोष आक्केमवाड यांनी कार्यकारी अभियंता यांना निवदेन दिले. या नुकसानाचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली आहे.
महिलांचा सत्कार
नांदेड : कोरोना काळातही महिलांचे समान योगदान लाभल्यामुळे नांदेड चाईल्ड लाईन १०९८ कार्यालयातील महिलांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. डी. जोशी-पाटोदेकर, अर्चना पारळकर, केंद्र समन्वयक बालाजी आलेवार, समुपदेशक आशा सूर्यवंशी, टीम मेंबर संगीता कांबळे, आकाश मोरे, नीता राजभोज, अश्विनी गायकवाड, जयश्री दुधाटे, एकनाथ पाच्छे, आदी उपस्थित होते.