जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर अनेकांनी खासगी कोविड सेंटर सुरू केले. तर काहींनी जय्यत तयारी करूनही ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने उद्घाटनापूर्वीच गाशा गुंडाळला. आजघडीला शहरात जवळपास ४५ हून अधिक खासगी कोविड सेंटर आहेत. रुग्ण वाढत असल्याने या रुग्णालयांनी बेडची संख्या वाढविल्याचे प्रशासनाला कळविले होते. परंतु त्यानंतरही या ठिकाणी वेटींगचा बोर्ड होता. महापालिकेकडे या सर्व रुग्णालयांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये बेडची संख्या नमूद आहे. परंतु गेल्या काही दिवसांत अनेक रुग्णालयांच्या बेडच्या संख्येत चढ-उतार असल्याचे दिसून आले. काही कोविड सेंटरने तर तब्बल निम्मे बेड कमी दाखविले. रुग्ण वाढत असताना बेडची संख्या का घटविली? याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. रेमडेसिविर किंवा अन्य कारणांसाठी बेडचा हा गोंधळ तर घातला नाही ना? याबाबत शंका आहे. परंतु या प्रकाराची सखोल चौकशी केल्यास मोठा घोटाळा बाहेर निघणार आहे हे मात्र नक्की.
बेडच्या संख्येबाबत खासगी रुग्णालयांची चलाखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 4:15 AM