नांदेड - नांदेड जिल्हयात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गोदावरी नदीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. पाण्याची आवक वाढल्याने नांदेड शहरातील विष्णुपुरी धरणाचे बारा दरवाजे उघडण्यात आले. त्यातून ४ हजार ४१२ क्युसेक इतक्या वेगाने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
मोठा प्रमाणात गोदावरी नदीत पाण्याचा विसर होत असल्याने गोदावरी नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे. गोदावरी नदीला जोडलेल्या अनेक नदी नाल्यांना पूर आलेला आहे. जिल्ह्यात आणखीन पाऊस सुरूच आहे. शिवायवरच्या धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी नदीत देखील विसर्ग वाढणार आहे. पूर परिस्थिती पाहता नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्क तिचा इशारा दिला आहे.