शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, एक गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 2:08 PM

भोकर ते म्हैसा राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळढव शिवारातील वळणावर झाला अपघात

भोकर/मातूळ (जि.नांदेड) : येथील म्हैसा रस्त्यावरील पिंपळढवजवळील वळणावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार, तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. मृतातील दोघे मातुळ येथील आश्रमशाळेचे कर्मचारी होते.

भोकर ते म्हैसा राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळढव शिवारातील वळणावर दुचाकी (क्र.एमएच २६ सीके ६६५९) व दुचाकी (क्र.एमएच २६ सीएफ ९६१८) यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार गंगाधर विश्वनाथ म्हैसुरे (वय ५५, रा.शिळवणी, ता.देगलूर. ह.मु. भोकर), तर परसराम किशन डाकोरे (वय ५०, रा.पांडुरणा, ता.भोकर) व दुसऱ्या दुचाकीवरील ज्ञानेश्वर गणेश मानेबोईनवाड (वय २५, रा.नांदा बु.), विनायक बुरोड (२५, रा.नांदा बु.) या चाैघांचा मृत्यू झाला. श्रावण हनुमंत पेडेमोडे (वय २३, रा.कुंभरगाव, ता.बिलोली) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला रवाना करण्यात आले. म्हैसुरे व डाकोरे हे दोघे कै.व्यंकटराव देशमुख निवासी आश्रमशाळा मातुळ येथे मदतनीस व कामाठीपदावर कार्यरत होते. अपघाताची माहिती कळताच, ग्रामीण रुग्णालयात मृताच्या नातेवाइकांनी गर्दी केली होती.

टॅग्स :AccidentअपघातNandedनांदेड