यामध्ये मॉडल डिग्री कॉलेज हिंगोलीसाठी महाराष्ट्र शासन अनुदान अंतर्गत मुला-मुलींच्या वसतिगृह बांधकामासाठी २०० लक्ष तरतूद करण्यात आली आहे. तर सोलार सिस्टिम करिता ३० लक्ष तरतूद करण्यात आली. कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र किनवट अंतर्गत आवर्ती खर्चासाठी ३४ लक्ष व अनावर्ती खर्चासाठी १४ लक्ष तरतूद करण्यात आली आहे. लातूर येथील उपकेंद्रांमध्ये मुला-मुलींच्या वसतिगृह बांधकामासाठी २०० लक्ष तरतूद करण्यात आली. परभणी येथील इमारत बांधकामासाठी १५० लक्ष तरतूद करण्यात आली. विद्यापीठाने लाईफ लाँग लर्निंग ची स्थापना करण्यासाठी महाविद्यालयांसाठी यंदा तरतूद केली आहे. यामध्ये संशोधन प्रोत्साहन योजनाकरिता १५ लक्ष, महाविद्यालयातील आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चासत्रे परिषदा सेमिनार इत्यादी योजना करिता २० लक्ष तरतूद करण्यात आली आहे. महाविद्यालयीन संशोधक प्रकल्पासाठी ५० लक्ष, तर विद्यापीठ संकुलातील शिक्षक संशोधकांसाठी २० लक्ष तरतूद करण्यात आली. संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापकांना आंतरराष्ट्रीय चर्चासत्र, परिषदांना उपस्थित राहण्यासाठी १५ लक्ष आणि विद्यापीठ संकुलातील संशोधकांसाठी १५ लक्ष तरतूद केली आहे. भाषा दिन करिता ७ लाख तर मराठी भाषा संवर्धन पंधरवडा करिता ५ लक्ष रुपये तरतूद करण्यात आली. सदर अर्थसंकल्प अधिसभेच्या ऑनलाईन बैठकीमध्ये सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
लातूर, हिंगोली येथील वसतिगृहासाठी प्रत्येकी दोन कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 4:17 AM