नांदेड : गोदावरी नदीत डंकीन परिसरात गुरुवारी उमरी येथील देवीदास दत्तराम बारसे यांचा पोत्यात मृतदेह आढळून आला होता़ या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने प्रल्हाद वाघमारे याला अटक केली होती़ या प्रकरणात न्यायालयाने मंगळवारी वाघमारे याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे़अर्धापूर तालुक्यातील उमरी येथील देवीदास दत्तराम बारसे हे २१ जानेवारीला आपल्या नातेवाईकाला घेवून उपचारासाठी नांदेडात आले होते़ नातेवाईकाला रुग्णालयात दाखल करुन ते गावाकडे निघाले होते़ परंतु, गावाकडे ते पोहोचलेच नव्हते़ दहा दिवसानंतर त्यांचा मृतदेह पोत्यात बांधलेल्या अवस्थेत गोदावरीत आढळला होता़ आरोपी प्रल्हाद वाघमारे याला विष्णूपुरी परिसरातून पोलिसांनी अटक केली होती़ प्रल्हाद वाघमारे व त्याचा मेहुणा सत्यनारायण मारोती उरांडे या दोघांनी देवीदास बारसे यांना २१ जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास चैतन्यनगर परिसरातील रुग्णसेवा २४ या रुग्णालयासमोरुन आपल्या दुचाकीवर बसवून सुगाव परिसरात पुलाखाली नेले होते़ या ठिकाणी बारसे यांचा खून केला होता़
आरोपीच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 12:41 AM