एक शेळी अन् दोन बोकड लंपास
नांदेड : शहरातील जयभिमनगर भागात चरण्यासाठी सोडलेली एक शेळी आणि दोन बोकडे चोरट्याने लांबविले. ही घटना १४ जानेवारीला घडली. सतीश साहेबराव नवघडे यांनी शेळी आणि बोकड चरण्यासाठी सोडले होते. तीन अज्ञात चोरट्यांनी ऑटोत टाकून त्यांना लांबविले. या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वाहनात झोपलेल्या चालकाचा मोबाईल लंपास
नांदेड : शहरातील आंबेडकर वाचनालयाजवळ पार्क केलेल्या चारचाकी वाहनात झोपलेल्या चालकाचा मोबाईल चोरट्याने लंपास केला. ही घटना १४ जानेवारी रोजी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. बळिराम परभाजी जाधव हे (एम.एच.२६, बीई ३२७) या क्रमांकाच्या वाहनात झोपले होते. त्यांच्या खिशातील सात हजार रुपये किमतीचा माेबाईल लंपास करण्यात आला. या प्रकरणात इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
घराबाहेर ठेवलेली बॅटरी चोरीला
नांदेड : घरातील इन्व्हटरसाठी असलेली बॅटरी घराबाहेर ठेवण्यात आली होती. साडेचौदा हजार रुपये किमतीची ही बॅटरी चोरट्याने लंपास केली. ही घटना गणेशनगर भागात घडली. या प्रकरणात गंगाराम आरोटे यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
खंजर, गुप्ती विकणाऱ्यास अटक
नांदेड : शहरातील गुरुद्वारा गेट क्रमांक एक समोरील दुकानात गुप्ती, खंजर, कुकरी ही शस्त्रे विक्री करणाऱ्या चालकाला पोलिसांनी पकडले आहे. त्याच्याकडून ही शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
गुरुद्वारासमोर बॉबी गिफ्ट सेंटरमध्ये सूरजसिंग रामसिंग भोसीवाले यांनी विक्री करण्यासाठी अनधिकृपणे गुप्ती, खंजर आणि कुकरीसारखी शस्त्रे ठेवली होती. याबाबतची माहिती वजिराबाद पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारून ही शस्त्रे जप्त केली. या प्रकरणात पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर ढगे यांच्या तक्रारीवरून वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.