शहरं
Join us  
Trending Stories
1
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
3
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
4
उदय सामंतांविरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला; पक्षप्रवेश होताच हाती मिळाला AB फॉर्म
5
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 
6
"मुलीला शिकवलंस तर सुशिक्षित नवरा कुठून आणणार?", लोकांचे टोमणे; मजुराची लेक झाली अधिकारी
7
ग्राहकाचे 50 पैसे ठेवणं डाक विभागाला भोवलं! आता भरपाई पोटी किती रुपये द्यावे लागणार? निकाल जाणून थक्क व्हाल!
8
Maharashtra vidhna Sabha 2024: शिंदेंच्या शिवसेनेचे पावशे निवडणूक लढविण्यावर ठाम
9
मोठी बातमी! "उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला, जो शब्द..."; संभाजी ब्रिगेडनं युती तोडली
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत किती मराठा उमेदवार?
11
"उद्धव ठाकरेंनी नातं..."; अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देताच शिवसेना नेत्याने सोडलं मौन
12
"माझ्या मतदारसंघात शरद पवार फॅक्टर चालणार नाही’’, अजित पवार गटातील आमदाराचा दावा
13
'आम्ही युद्धाचे नाही, संवाद अन् मुत्सद्देगिरीचे समर्थक', BRICS मधून पीएम मोदींचा जगाला संदेश
14
आमदार विरुद्ध आमदार! कोरेगावात 'तुतारी' वाजणार की 'धनुष्यबाण' सुस्साट? दोन शिंदेंमध्ये लढत
15
जनतेच्या मनातला सामान्य आमदार मिळेल; उमेदवारी घोषित होताच महेश सावंत यांचा टोला
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात पोलिसांना आणखी एक आरोपी सापडला; आतापर्यंत ११ जणांना अटक
17
माहिमच्या हायप्रोफाइल लढतीत उद्धव ठाकरेंनी उतरवला शिवसैनिक, कोण आहेत महेश सावंत?
18
Mahayuti Seat Sharing: 106 जागांचा गुंता, कोणत्या विभागातील किती जागांची घोषणा बाकी?
19
मंत्रि‍पदासाठी फोन आला, १०० रुपये उसने घेऊन कपडे घेतले अन् शपथविधीला गेले; श्रीगोंद्यातील नेत्याचा किस्सा! 
20
अरे देवा! ७ मुलांची आई बॉयफ्रेंडसह पळून गेली, ढसाढसा रडत मुलांनी गाठलं पोलीस ठाणं, म्हणाले...

भारत जोडो यात्रेतील दोघांना ट्रकने उडविले; एकाचा मृत्यू, अशोक चव्हाणांची रुग्णालयात धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 8:22 AM

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेचा नांदेड जिल्ह्यातील गुरुवार हा चौथा दिवस होता.

विष्णुपुरी (नांदेड) : भारत जोडो यात्रेतील दोघांना आयचर (ट्रक) वाहनाने उडविले. या घटनेत एका यात्रेकरूचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, अपघातानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शासकीय रुग्णालयात धाव घेत जखमी असलेल्या यात्रीची विचारपूस केली.

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेचा नांदेड जिल्ह्यातील गुरुवार हा चौथा दिवस होता.  नवीन मोंढा परिसरात आयोजित जाहीर सभेनंतर भारत यात्री महादेव पिंपळगाव येथील कॅम्पकडे रवाना झाले. दरम्यान, रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास महादेव पिंपळगाव परिसरात नांदेड-अकोला हायवेवर पायी चालणाऱ्या तामिळनाडू राज्यातील गणेशन (६२) आणि सययुल (३०) या दोन यात्रेकरुना आयचरने धडक दिली. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु गणेशन (६२) यांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या जखमी यात्रीवर उपचार सुरू आहेत. 

अशोक चव्हाण तत्काळ रुग्णालयात

या घटनेची माहिती मिळताच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार मोहन हंबर्डे यांनी तात्काळ शासकीय रुग्णालय गाठले. रात्री साडेबारा वाजेपर्यंत चव्हाण हे रुग्णालयात होते. परंतु, डोक्याला जबर दुखापत झालेल्या भारत जोडो यात्रीला वाचविण्यात डॉक्टरांना यश आले नाही.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेस