गुन्ह्याचे तपासी अंमलदार आणि पोलीस उपनिरीक्षक शालिनी गजभारे यांनी महिला आरोपींना न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रांतील सूरज खिराडे यांच्या तक्रारीचाही समावेश आहे. २० रोजीच्या गोळीबाराचे सविस्तर वर्णन तक्रारीत असून, त्यामध्ये २ जुलै २०२० रोजी विक्की ठाकूरचा मित्र विक्की चव्हाण याच्या झालेल्या खुनाचाही संदर्भ देण्यात आला होता. त्याचवेळी न्यायालयात साक्ष न देण्यासाठी विक्की ठाकूर यास दोन्ही महिलांनी धमकी दिल्याचे नमूद आहे. यावर अंजली आणि ज्योती बिघानिया यांचे वकील ॲड. मिलिंद एकताटे यांनी इतर पाच आरोपींना पकडण्यासाठी दबावतंत्र वापरता यावे म्हणूनच या महिलांची नावे गुन्ह्यात गाेवली आहेत. अंजलीकडे दोन मुले आहेत, अशा परिस्थितीत यांचा त्या कटाशी काहीही संबंध नाही, असे व इतर युक्तिवाद मांडले, तर सहाय्यक सरकारी वकील मोहम्मद रजियाेद्दीन यांनी बाजू मांडताना या गुन्ह्यातील कट रचण्यामध्ये अंजली व ज्योती बिघानिया यांचा समावेश असल्याचे सांगितले. दरम्यान, न्यायालयाने युक्तिवाद ऐकून सदर दोन्ही महिलांना दोन दिवस म्हणजेच २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
विक्कीसोबत दोघांचा होणार होता खून; दोन महिलांना दोन दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 4:12 AM