शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

धर्माबादला दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 4:17 AM

लाचखोर गुंडरेला जामीन नांदेड - थकित देयके काढण्यासाठी १५ हजाराची लाच घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागाचे प्रभारी कार्यकारी ...

लाचखोर गुंडरेला जामीन

नांदेड - थकित देयके काढण्यासाठी १५ हजाराची लाच घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता महेश गुंडरे याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडीनंतर जामीन दिला. मंगळवारी त्यांना लाच घेताना पकडण्यात आले होते.

स्वखर्चातून गोळ्या उपलब्ध

किनवट - भाजपाचे तालुका सरचिटणीस बालाजी आलेवार यांनी स्वखर्चातून व्हीटॅमीनच्या गोळ्या कोरोना रुग्णांसाठी वाटप केल्या आहेत. यावेळी शिवणीचे डॉ.कानीफनाथ मुंडे, डॉ.कोगे, यादव आमले, प्रकाश कार्लेवाड, इस्लापूर येथील डॉ.गायकवाड, मारोती शेळके, गौतम कांबळे, अप्पाराव पेठ येथे डॉ.रवींद्र मंडगीकर, सुपरवायझर के.एन.गारोळे, गंगन्ना कडताल आदी उपस्थित होते.

शेळगावात धूळ फवारणी

देगलूर - तालुक्यातील शेळगाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने धूळ फवारणी करण्यात आली. यावेळी सरपंच प्रतिनधी हणमंत नमले, उपसरपंच संतोष गुरफळे, सुरेश पाटील, पिराजीराव राजुरे, शिवकुमार देबाडे, गंगाधर अंकमवार, श्रीनिवास उप्पलवार, राजेश्वर गुरफळे, मल्लेश बरगे, धम्मपाल कापसे आदी उपस्थित होते.

तीन हजार जणांनी घेतली लस

कुंडलवाडी - येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ४५ वर्षावरीलएकूण ३ हजार १६२ जणांनी लस घेतल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.विनोद माहुरे व डॉ.नरेश बोधनकर यांनी दिली. कुंडलवाडी प्रा.आ. केंद्रांतर्गत पाच उपकेंद्राचा समावेश असून९ ते ५ या वेळेत लस दिली जात आहे.

पोलीस कोठडी वाढली

देगलूर - येथील ११ वर्षीय बालकाच्या अपहरण प्रकरणातील आरोपी महेश बोईनवाड याची पोलीस कोठडी चार दिवसांनी वाढवण्यात आली आहे. यापूर्वी पाच दिवस तो पोलीस कोठडीत होता. पुढील तपास कार्यासाठी पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयात केली होती. दरम्यान आरोपीकडून बरीच माहिती उघड होण्याची शक्यता आहे.

अध्यक्षपदी आबादार

अर्धापूर - गुरुदेव सेवा मंडळाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी गजानन आबादार यांची निवड झाली. या निवडीबद्दल विलास वाघमारे, डॉ.विजय जाधव, सरपंच संभाजी पांचाळ, उद्धव आबादार, प्रशांत आबादार, डॉ.विनोद जाधव यांनी त्यांचे स्वागत केले.

व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी

बारड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारडमधील व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. सरपंच प्रभाकर आठवले, उपसरपंच बाळासाहेब देशमुख यांनी याकामी पुढाकार घेतला. यावेळी ९३ जणांची टेस्ट करण्यात आली. यापैकी तिघे पॉझीटीव्ह निघाले. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक वानोळे, तलाठी अंजली बार्शीकर, एएनएम मेहत्रे, गजानन पत्रे, दिगंबर टिप्परसे, अवधूत शिरगीरे आदी उपस्थित होते.

मास्क, सॅनिटायझरचे वाटप

किनवट - येथील आनंद मच्छेवार मित्रमंडळाकडून किनवट पोलीस स्टेशनमध्ये मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी राजेंद्र भातनासे, बाळकृष्ण कदम, सुनील मच्छेवार, जगदीश तिरमनवार, किरण कस्तुरवार, आकाश रेड्डी, गणेश बिरेवार, बालाजी यम्मलवार, नरसिंग तक्कलवार आदी उपस्थित होते.

वन्यजीव धोक्यात

मांडवी - जंगलात जागोजागी वणवे पेटत असल्यामुहे वनसंपत्तीचे नुकसान होत असून जंगल प्राण्यांचेही मोठे हाल होत आहेत. जंगलातील पाणीसाठे पूर्णत आटले आहेत. पानवठे निर्माण केले नसल्यामुळे जंगलातील प्राणी पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. यातच दोन-चार दिवसात जंगलाला आगही लागत असल्याचे प्रकार घडत असल्याने प्राण्यांचे हाल होत आहेत.

आंदेगावच्या दोरेवाडचे यश

हिमायतनगर - दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत आंदेगाव येथील दिगंबर दोरेवाड याने ४०० मीटर धावणे स्पर्धेत बीड जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवला. पुणे येथे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली होती. मात्र कोरोनामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. त्याने यापूर्वी नांदेड येथे झालेल्या २०० मीटर धावणे स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळविला होता.

सरवदे यांची बदली

देगलूर - देगलूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम केलेले रमेश सरवदे यांची सोलापूरला बदली झाली आहे. त्यापूर्वी त्यांची देगलूरहून पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली होती. १६ एप्रिल रोजी राज्याचे गृह उपसचिव कैलास गायकवाड यांनी काढलेल्या आदेशात त्यांची सोलापूर येथे बदली केल्याचे नमूद केले.

कुंटूरचे रस्ते सील

कुंटूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार गजानन शिंदे यांच्या सूचनेनुसार कुंटूरमधील रस्ते सील करण्यात आले आहेत. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मारोतराव कदम, ग्रा.पं. सदस्य दत्तू नळकंठे, राजू अडकिणे, प्रल्हाद अडकीणे, बालाजी अडकिणे, शिवाजी रेनेवाड, नितीन हणमंते, गणेश सांगे, सिद्धार्थ गजभारे उपस्थित होते.