चारित्र्यावर संशय घेवून विवाहितेला मारहाण करण्यात आली. ही घटना मुधोळ तालुक्यातील मौजे वडझरी येथे घडली. पिडीतेला उपाशीपोटी ठेवून मारहाण केली. या प्रकरणात उमरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोना.गेडाम करीत आहेत.
चार्जिंगला लावलेला मोबाईल लांबविला
घराच्या खिडकीत चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरट्याने लंपास केला. ही घटना ५ एप्रिल रोजी जिल्हा परिषद कॉलनी येथे घडली. नामदेव जर्नाधन कराड यांनी १० हजार रुपये किमतीचा मोबाईल खिडकीत चार्जिंगला लावला होता. त्यांची नजर चुकवून चोरट्याने तो लंपास केला. याप्रकरणात भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जुन्या भांडणाच्या कारणावरुन मारहाण
भोकर तालुक्यातील चिंचाळा येथे जुन्या भांडणाच्या कारणावरुन दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना २९ मार्च रोजी घडली. हनमंतू नरसिंगा करेवाड हे चंपती महाराजाच्या मंदिराजवळ उभे असताना आरोपी त्या ठिकाणी आले. यावेळी त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन त्यांच्याशी वाद घालून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासह अन्य एकाचे डोके फोडण्यात आले. याप्रकरणात भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वॉकींगसाठी गेलेल्या मुलाचे अपहरण
शहरातील ब्रम्हपुरी चौफाळा भागात वॉकींगसाठी घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्यात आले. ही घटना ५ एप्रिल रोजी घडली. अभिजित सुरकुटवार असे मुलाचे नाव असून नावघाट येथे तो वॉकींगसाठी गेला होता. अज्ञात इसमाने त्याचे अपहरण केले. या प्रकरणात किशन सुरकुटवार यांच्या माहितीवरुन इतवारा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.