प्लॉटच्या पैशासाठी जबर मारहाण
शहरातील भावसार चौक भागात प्लाॅटच्या पैशावरून झालेल्या वादानंतर विशाल बालाजी नरवाडे यांना शिवकुमार बैनवाड, रामा कलेवाड, शिवकांता पुण्यलवाड आणि रावसाहेब पुण्यलवाड यांनी जबर मारहाण केली. याप्रकरणात भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला.
दारूच्या कारणावरून घातला गोंधळ
उस्माननगर येथे उदासीन बाबा चौकात दारू पाजण्याच्या कारणावरून काही जणांनी गोंधळ घातला. पोलिसांनी या प्रकरणात कमलाकर नागाेराव शिंदे, अंकुश बालाजी कदम, सुनील विश्वनाथ घोरबांड आणि बापूजी तानाजी घोरबांड यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला.
गाय सोडली म्हणून केली मारहाण
मनाठा येथे गाय सोडल्यास ती माझ्या नातवाला मारेल असे म्हणून एका वृद्धाला काठीने मारहाण करण्यात आली. गवळण जळबाजी शेळके यांच्या तक्रारीवरून बालाजी विठ्ठलराव सोळंके याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला.
आणीबाणी निषेध दिनाचे आयोजन
२५ जून १९७७ ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावली होती. हा काळा दिवस म्हणून पाळण्यात येतो. सिडको येथील वासवी मंगल कार्यालयात सकाळी १० वाजता लोकतंत्र सेनानी संघाच्या वतीने निषेध दिनाचे आयोजन केले आहे. उपस्थितीचे आवाहन अध्यक्ष दत्ताेपंत देबडवार, तुकाराम वारकड गुरुजी, एल.के. कुलकर्णी यांनी केले आहे.