शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

अवकाळीमुळे तापमानाचा यु टर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:28 AM

गेल्या काही दिवसांत तापमानात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे यंदा उन्हाळा अधिक तापदायी ठरण्याचे आडाखे बांधणाºया नागरिकांची निसर्गाने फिरकी घेतली़ गेल्या दोन दिवसांत नांदेडसह ग्रामीण भागात सूर्यदर्शन झाले नसून शुक्रवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली़ नांदेड शहरातही दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती़ त्यामुळे तापमान कमालीचे घसरले असून गारठाही वाढला होता़

ठळक मुद्देमार्चमध्ये उघडल्या छत्र्या : दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण, पिके,फळबागांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : गेल्या काही दिवसांत तापमानात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे यंदा उन्हाळा अधिक तापदायी ठरण्याचे आडाखे बांधणाºया नागरिकांची निसर्गाने फिरकी घेतली़ गेल्या दोन दिवसांत नांदेडसह ग्रामीण भागात सूर्यदर्शन झाले नसून शुक्रवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली़ नांदेड शहरातही दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती़ त्यामुळे तापमान कमालीचे घसरले असून गारठाही वाढला होता़मार्चच्या पहिल्या आठवड्यात नांदेडचे तापमान ३८ अंशावर गेले होते़ त्यामुळे उन्हाळा सुरु झाल्याचा अनुभव येत होता़ दुपारच्या वेळी रस्त्यावरही शुकशुकाट राहत होता़ कुलरच्या विक्रीतही वाढ झाली होती़ परंतु अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याचे दिसून येत आहे़ गुरुवारी दिवसभर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी सूर्यदर्शन झाले नाही़ त्यानंतर शुक्रवारी सकाळच्या वेळी शहरात शिडकावा झाला़दुपारनंतर मात्र पावसाची सारखी रिपरिप सुरु होती़ रात्री उशिरापर्यंत अधूनमधून पाऊस हजेरी लावत होता़ त्यामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली़ तापमानाचा पाराही २४ अशांपर्यंत घसरला होता़ त्यामुळे नांदेडकरांना हुडहुडी भरत होती़शुक्रवार बाजारात उडाली तारांबळगोकुळनगर भागात भरणाºया शुक्रवारच्या बाजारात अचानक आलेल्या पावसामुळे विक्रेते आणि नागरिकाची तारांबळ उडाली़ यावेळी विक्रेत्यांनी मिळेल त्या ठिकाणी आडोसा घेतला़ त्यानंतर काही वेळ बाजारात ग्राहकांची वर्दळ सुरु झाली होती़ त्यानंतर अधूनमधून सारखी हजेरी लावलेल्या पावसामुळे अनेक जण बाजाराकडे फिरकलेच नाहीत़ त्यामुळे दिवसभर भाजीपाला घेवून बसलेल्या विक्रेत्यांची मोठी निराशा झाली़जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत पावसाची हजेरीमांडवी : गत दोन दिवसांपासून मांडवी भागात सूर्यदर्शन झाले नाही़ शुक्रवारी अधूनमधून चालू असलेल्या रिमझिम पावसाने वातावरणात गारवा वाढलाक़ाढणीस आलेला हरभरा, गहू, ज्वारी इ़ रबी पिकांवर हवामानाचा परिणाम झाला आहे़ गत दोन दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नाही़बिलोली : गत दोन दिवसांपासून बिलोली व परिसरात सूर्यदर्शन झाले नाही़ शुक्रवारी दुपारी ३ नंतर रिमझिम पाऊस सुरु झाला़ वातावरणातील बदलाने आजारही वाढले आहेत. शेतीची कामे विस्कळीत झाली असून बाजारपेठेतही सामसूम होती़ शुक्रवारी सायंकाळी सर्वदूर पाऊस झाला़कुंटूर : नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरात आज दुसºया दिवशीही अवकाळी पाऊस होवून काही भागात गारपीटही झाली. या अवकाळी पावसामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. कुंटूर, सालेगाव राहेर, बेळगाव कोकलेगाव, शेळगाव, सांगवी, धनंज, सातेगाव, तालुक्यात शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे .गडगा : गडगा व परिसरात शुक्रवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या़ त्यानंतर सायंकाळी सहा वाजल्यापासून पावसाची रिपरिप चालू आहे. यातच गडग्यासह पाच गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता़ अवकाळीमुळे परिसरातील फळबागांसह पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे़जीव टांगणीला़़़भोकर: मागील दोन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होवून सततच्या ढगाळ वातावरणासह शुक्रवारी दुपारनंतर रिमझिम पाऊस सुरु झाल्याने शेतकºयांचा जीव टांगणीला लागला आहे. दुपारी ३ वाजेनंतर रिमझिम पावसास सुरुवात झाली. साधारणत: एक तास पडून उघडलेल्या पावसाने सायंकाळी ५ वाजता पुन्हा हजेरी लावली. हरभरा पिकाची काढणी झाली असली तरी गहू २२५० हेक्टर, ज्वारी ५५२ हे. मका २२६ हेक्टर क्षेत्रावर असलेले पीक ढगाळ वातावरणामुळे धोक्यात आले आहे़ त्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे.पिकांचे नुकसानबोंडअळी व त्यानंतर झालेला अवकाळी पाऊस,गारपिटीमुळे शेतकºयांना मोठा फटका बसला होता़ त्याची अद्याप भरपाईही करण्यात आली नाही़ तोच पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट दारात येवून उभे राहिले आहे़ गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे हरभरा, गहू, ज्वारीसह हळद या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे़